College 
जळगाव

जळगाव जिल्ह्यात वरिष्ठ महाविद्यालये बुधवार पासून गजबजणार

सकाळ वृत्तसेवा


जळगाव ः राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये (College) सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून (State Government) मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या बुधवारपासून जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक (Covid restrictive) लसीचे दोन (Vaccination) डोस पूर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार आहे.



कोरोना संसर्ग प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये, महाविद्यालये १५ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. २४ मार्चपासून लॉकडाउन संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून महाविद्यालयीन शिक्षण सुरू होउन परिक्षा देखिल ऑनलाईन घेउन पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर तब्बल १० ते ११ महिन्यांनंतर १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थिती आदेशानुसार महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु पुन्हा संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे १० मार्च २०२१ पासून पुढील आदेश येईपर्यंत महाविद्यालये बंद करण्यात आली होती.



जून २०२१ नंतर संसर्ग साखळी खंडीत झाल्याने ऑगस्टनंतर टप्प्याटप्प्याने ८ वी ते १० वी, ४ ऑक्टोबरनंतर ११ वी, १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर शासन निर्देशासह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत स्थानिक परिस्थिती व प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सेवा सुविधांची उपलब्धता लक्षात घेउन कोविडसंसर्ग नियमावली मार्गदर्शक सूचना मानक या नियमांचे पालन करून १८ वर्षे वयोगटावरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी संसर्ग प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाविद्यालये, विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्गाचे नियम पाळावे व सुरक्षित राहावे.

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT