corona 
जळगाव

ऑक्सिजनच्या गरजेविना ‘डेल्टा’चे सहाही रुग्ण बरे

Jalgaon corona News : जिल्ह्यात ‘डेल्टा’ बाधित सात रुग्ण आढळले होते. गेल्या जूनमध्ये पारोळा तालुक्यातील एकाच गावातील हे सात रुग्ण होते.

सकाळ डिजिटल टीम

दोन्ही लाटांचा सामना प्रशासन व नागरिकांनी मिळून समर्थपणे केला. आता गेल्या महिन्यापासून दुसरी लाट ओसरू लागली आहे.



जळगाव : पहिल्या व दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट (Corona first second wave) बनलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने (Delta Plus variant Patient) बाधित आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. असे असले तरी हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यापैकी एकालाही ऑक्सिजन (Oxygen) लावण्याची गरज भासली नाही. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनच जळगाव जिल्हा संसर्गाचा ‘हॉटस्पॉट’ बनला होता. पहिल्या व दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असलेल्या देशातील निवडक जिल्ह्यांत जळगाव जिल्ह्याचे नाव अग्रभागी होते.

लाट ओसरली, चिंता कायम
या दोन्ही लाटांचा सामना प्रशासन व नागरिकांनी मिळून समर्थपणे केला. आता गेल्या महिन्यापासून दुसरी लाट ओसरू लागली आहे. ती पूर्णपणे ओसरत असताना ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने बाधित आणखी सहा रुग्ण समोर आले आहेत. याआधीही जिल्ह्यात ‘डेल्टा’ बाधित सात रुग्ण आढळले होते. गेल्या जूनमध्ये पारोळा तालुक्यातील एकाच गावातील हे सात रुग्ण होते. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ बाधित आतापर्यंत १३ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.

जळगावसह जामनेरात
सद्य:स्थितीत नव्याने आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’ बाधित रुग्णांमध्ये जळगाव मनपा क्षेत्रातील दोन, जामनेरातील तीन व पारोळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पारोळा येथील रुग्ण लक्षणेविरहित होता, तर जळगाव व जामनेरातील रुग्णांना सौम्य लक्षणे होती. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात होते, त्यापैकी कुणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही. सर्वच्या सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. पैकी पारोळा येथील रुग्णाने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस बाधित झाल्यानंतर घेतल्याचे निदर्शनास आले आहे.


चिंतेचे कारण नाही
विषाणूने जनुकीय रचना बदलत राहणे हा त्या विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ बाधित रुग्ण आढळून आले असले तरी नागरिकांनी चिंता न बाळगता कोरोनासंबंधी नियम पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT