corona free 
जळगाव

जळगावसाठी मोठा दिलासा :तब्बल चौदा महिन्यांनंतर ‘शून्य’ रुग्ण

Jalgaon Corona News : मार्च, एप्रिलमधील कडक लॉकडाउन, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम म्हणून गेल्या महिनाभरात तर रुग्णसंख्या कमालीची घटली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून दुसरी लाट ओसरेपर्यंत म्हणजेच गेल्या महिन्यापर्यंत जळगाव जिल्ह्याची स्थिती भीषण होती.


जळगाव: कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona first Wave) गेल्या वर्षी २२ मेस जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. त्यानंतर तब्बल चौदा महिन्यांनंतर गुरुवारी (ता. ५) जिल्ह्यात नव्या एकाही रुग्णाची (Patient) नोंद नाही. सुमारे दीड लाखापर्यंत एकूण रुग्ण आणि अडीच हजारांवरील मृतांच्या आकड्यात जिल्ह्यासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने जळगाव जिल्ह्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.


कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून दुसरी लाट ओसरेपर्यंत म्हणजेच गेल्या महिन्यापर्यंत जळगाव जिल्ह्याची स्थिती भीषण होती. पहिल्या लाटेत एप्रिल ते सप्टेंबर २०२०पर्यंत जिल्हा हॉट स्पॉट बनला होता. ऑक्टोबरनंतर पहिली लाट ओसरू लागली आणि फेब्रुवारीत पुन्हा दुसऱ्या लाटेची तीव्रता सुरू झाली. या लाटेतही जळगाव जिल्हा पुन्हा हॉट स्पॉट बनला. रुग्णांना बेड मिळणे कठीण बनले.


लाट ओसरू लागली
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजारांवर गेली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत मृतांची संख्या दोन हजार ५७५ वर पोचली. या लाटेची तीव्रता मेपासून ओसरू लागली. ती जून, जुलैपर्यंत पूर्ण नियंत्रणात आली. मार्च, एप्रिलमधील कडक लॉकडाउन, प्रभावी उपाययोजनांचा परिणाम म्हणून गेल्या महिनाभरात तर रुग्णसंख्या कमालीची घटली आहे.


चौदा महिन्यांनी शून्य रुग्ण
गेल्या तीन-चार आठवड्यांपासून रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या दहाच्या आतच राहिली. दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढून ९८.१५ टक्क्यांपर्यंत पोचले. गुरुवारी तीन हजार ८२४ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून एकही रुग्ण बाधित आढळून आला नाही. तर दिवसभरात सहा रुग्ण बरे झाले. गेल्या २० दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद नाही. हे सर्व आकडे जिल्ह्यासाठी दिलासा देणारे ठरले असून, ही कोरोनामुक्तीकडे वाटचाल असल्याचे द्योतक आहे. आता पुढचे २८ दिवस रुग्ण आढळून न आल्यास जिल्हा कोरोनामुक्त जाहीर होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

Marathi News Live Updates : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात

Akola News: दुष्काळी संकटाचे सावट, खरीप पिकांची अवस्था गंभीर; शिवार फेरीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT