voter list
voter list 
जळगाव

जिल्हयातील ७८३ ग्रामपंचायतीची मतदार यादी या दिवशी होणार प्रसिध्द

देविदास वाणी

जळगाव : जिल्हयातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका फेब्रूवारी २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाने निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीची मतदार याद्या प्रसिध्द करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. १ डिसेंबरला ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या प्रसिध्द होतील. 
मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अंतीम मतदार यादी १० डिसेंबरला प्रसिध्द होईल. मतदार याद्या प्रसिध्द करताना त्यांनी दुबार नावे वगळणे, रहिवास सोडून गेलेल्यांची नावे वगळणे, विधानसभा निहाय मतदार आहेत किंवा नाही याची तपासणी करणे आदी सूचना निवडणूक आयोगाने केलेल्या आहेत. त्यानूसार ग्रामपंचायत विभाग कार्यरत आहे. 

फेब्रुवारीत निवडणूकांची शक्‍यता
गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूका कोरोनामुळे रखडलेल्या आहेत. मार्च महिन्यात संपणाऱ्या निवडणूकीसाठी निवडणूकीची प्रक्रिया जानेवारी, फेब्रूवारी महिन्यातच सूरू झाली होती. प्रभाग रचना, वार्ड रचना तयारी सुरू होती. तोच कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याने सर्वच निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. आता फेब्रूवारीत संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतील अशी अपेक्षा ठेवून निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या प्रसिध्दी, हरकती, अंतीम मतदार यादया तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 

सरपंच निवडणूक सदस्यांमधून 
राज्यात भाजपची सत्ता असताना लोकनियूक्त सरपंच निवडून आणण्याची पध्दत सुरू केली होती. ती पध्दत रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंच निवउ आता होणार आहे. ज्या पक्षाचे सदस्य अधिक निवडून येतील त्याची सत्ता ग्रामपंचायतीवर असेल. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT