जळगाव

सलग दुसऱ्या दिवशी दिलासा; दिवसभरात केवळ १४० कोरोना बाधित

भूषण श्रीखंडे

जळगाव  : जिल्ह्यात कमी होत असलेली कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी अचानक कमी झाली. सलग दुसऱया दिवशी रुग्णसंख्या कमी होत शनिवारी १४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, गेल्या तीन महिन्यांतील गुरूवारी सर्वात निचांकी रुग्णसंख्या आली असून आज देखील निचांकी संख्या आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचा दिसत आहे. दरम्यान, आज ४८६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आवश्य वाचा- अरे व्वा आता 40 टक्क्यांवर मिळणार अभियांत्रिकीला प्रवेश ! 

 
जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होत असून, रुग्ण बरे होऊन घरी जाणे, तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील कमी झाले होते. त्यात गुरुवारी बाधितांची संख्या दुप्पट आल्याने खळबळ उडाली  होते. मात्र, शुक्रवारी तीन महिन्यांतील सर्वांत निचांकी रुग्णसंख्या १२१ आल्याने मोठा दिलासा मिळाला. तर सलग दुसऱया दिवशी दिडशेच्या आत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यात आज शनिवारी दिवसभरात १४० नवे बाधित रुग्‍ण आढळल्‍याने एकूण रुग्णसंख्या ५० हजार९२६ वर पोचली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण तीप्पट असून, शनिवारी ४८६ जण घरी परतले. त्यामुळे आता बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ४६ हजार ७५१ वर पोचली आहे. सद्यःस्थितीत चार हजार ५५८ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९१.७३ टक्क्यांवर आला आहे. 

असे आढळले रुग्‍ण 
जळगाव शहर- ४७, जळगाव ग्रामिण-३,  भुसावळ- ३७, अमळनेर- ४, चोपडा- ८, पाचोरा २, भडगाव-२,  धरणगाव- १, यावल- ३, एरंडोल- २, जामनेर- ८, रावेर- ५ पारोळा- ४, चाळीसगाव- १०, बोदवड- एक व इतर जिल्ह्यातील ३ रुग्णाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT