जळगाव

जळगाव जिल्ह्यात मतदार नावनोंदणीत महिला मागे

Jalgaon Voters News: कोणत्याही निवडणुकीत महिलांचा कोटा राखीव असतो. मात्र मतदानावेळी त्या मागे असतात, असेच आकडेवारीतून दिसत आहे.

देविदास वाणी

निवडणूक विभागाने मतदार ओळखपत्र ई-ईपीक कार्ड ऑनलाइन काढण्याची सुविधा केवळ १८ वर्षांनंतर पहिल्यांदा नावनोंदणी करणाऱ्यासाठी दिली आहे

जळगाव ः निवडणुकीवेळी मतदान करण्यास सर्वच उत्सुक असतात. महिला मतदान करण्यास अग्रभागी असतात. मात्र त्यांचे मतदार नोंदणीची (voter registration) प्रमाणे एक हजार पुरुष मतदारांमागे ९१९ महिला मतदार इतके आहे. हजार पुरुषांमागे ८१ महिला मतदार नोंदणीच करीत नाही. महिलांनी मतदार नोंदणीत सहभागी होऊन मतदान केले, तर महिलांचा मतदानातील टक्का वाढेल, असे प्रशासनाकडून (Administration) सांगण्यात येत आहे.

कोणत्याही निवडणुकीत महिलांचा कोटा राखीव असतो. मात्र मतदानावेळी त्या मागे असतात, असेच आकडेवारीतून दिसत आहे. सर्वच वयोगटांतील महिलांनी आपले नाव मतदारयादीत आहे किंवा नाही याची खात्री करून मतदार नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले आहे.

सहा हजार नवमतदारांनी काढले ई- ईपीक कार्ड
निवडणूक विभागाने मतदार ओळखपत्र ई-ईपीक कार्ड ऑनलाइन काढण्याची सुविधा केवळ १८ वर्षांनंतर पहिल्यांदा नावनोंदणी करणाऱ्यासाठी दिली आहे (नवमतदार). २०२१ मध्ये आतापर्यंत नऊ हजार ९४१ नवमतदारांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी सहा हजार ८९३ नवमतदारांनी ई-ईपीक मतदार कार्ड डाउनलोड केले. तीन हजार ४८ मतदार ई-ईपीक कार्ड डाउनलोड करावयाचे बाकी आहेत.


जिल्ह्यातील मतदाराची संख्या अशी ः
पुरुष मतदार - १७ लाख ८२ हजार ३६७
महिला मतदार - १६ लाख ३९ हजार ३२३
एकूण मतदार - ३४ लाख २१ हजार ७७६
तृतीयपंथी मतदार - ८६


१८ ते १९ वयोगटांतील मतदार - ६७ हजार ५६६
२०-२९ गटांतील - सहा लाख ९७ हजार ६५५
५०-६० वयोगटांतील - पाच लाख १८ हजार ४१७
८०-९० वयोगटांतील - ८१ हजार २२२
९० ते शंभर वयोगटांतील - १३ हजार ८६४
शंभर वयापेक्षा अधिक वय असलेले - १३२

मतदारांचे गुणोत्तर - १०००ः ९१९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT