Firing 
जळगाव

धक्कादायक: कोंबडीचे पिल्लु मारल्याचा राग,थेट मांजरीवर गोळीबार

भूषण श्रीखंडे

जळगाव ः शहरात गुन्हेगारीच्या (Crime) आलेख वाढत असून शुल्लक कारनावरून खुन, हानामारी तसेच गोळीबाराच्या (Firing) घटना या घडत आहे. आज देखील जळगाव शहर गोळीबाराने हादरले असून यात मात्र मनुष्याचा मृत्यू झाला नसून एका मुक्या प्राण्याचा मृत्यू झाला आहे. एका मांजरीने (Cat) कोंबडीच्या पिल्लावर झडप घातल्याच्या कारणावरून माथेफिरुने या मांजरीवर चक्क बंदुकीची गोळी झाडून ठार (Death) केल्याची धक्कादायक घटना ही घडली. त्यानुसार तालूका पोलिसांत (Police) या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील वाघ स्टाॅप पुढील गिरणा पंपीग रोडावरील गुरुकृपा काॅलनी येथे पुष्पराज प्रमोद बाणाईत (वय-२१) कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांनी दोन मांजरी पाळल्या असून त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी देखील कोंबड्या पाळल्या असून आज सकाळी एका मांजरीने कोंबडीच्या एका पिल्लावर झडप घालत शिकार केली. आपल्या कोंबडीचे पिल्लू मारल्याचा राग शेजारी राहणाऱ्यांना अनावर होवुन या माथेफिरूने घरातून चक्क छऱ्याची बंदूक आणत थेट मांजरीच्या दोन्ही डोळ्यांच्या मधोमध गोळी झाडली. क्षणात मांजर खाली कोसळून तरफडत मेली.


मी असाच आहे..आता काळ्या मांजरीचा नंबर
बाणाईत यांच्यासह परिवाराने शेजारी राहणाऱ्या हेमराज ओंकार सोनवणेला जाब विचारला असता ‘मी असाच आहे असे उद्धटपणे बोलून.. आता या काळ्या मांजरीचा नंबर आहे..असे सांगत या मांजरीवरही बंदुक रोखल्याचा सर्व घटनाक्रम मोबाईल कॅमेरात कैद झाला. याप्रकरणी तालूका पेालिसांत या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


व्हिडीओ व्हायरल..
बंदुकीने मांजरीच्या कवटीचा वेध घेणाऱ्या हेमराज सोनवणे याचा हा व्हिडीओ काही वेळातच व्हायरल झाला, प्रसारमाध्यमांसह तो, पोलिसांपर्यंत पोहचल्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी गंभीर दखल घेत या प्रकरणी कारवाईच्या सुचना दिल्या. घडल्या प्रकारात तालूका पेालिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


संशयीत वन्य जीव संस्थेशी संबधीत?
पुष्पराज बाणाईत यांच्या तक्रारीवरुन हेमरांज सेानवणे यांच्यावर गुन्हा तर दाखल झाला असून संशयीत हा काही काळी वन्यजीव संस्थेशी देखील संबधीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे घडलेली घटना गंभीर असल्याचे वन्यप्रेमींकडून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT