Plant bowl Plant bowl
जळगाव

कांद्याच्या रोपवाटिका तयार..खानदेशात जास्त लागवडीचे संकेत

कांदा लागवडीसाठी खानदेशात सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर रोपवाटिका तयार झाल्या आहेत

बालकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा) : कांद्याला (Onion) सध्या चांगले भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचा (Farmer) या पिंकाच्या लागवडीचा कल वाढला असून खानदेशात (Khandesh) खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड (Planting) होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कांद्याच्या रोप वाटीका (Plant bowl) देखील तयार झालेल्या असल्याचे चित्र दिसू लागले आहे. (khandesh planting farmer onion plant bowl redy)

सध्या उन्हाळ कांदा काही प्रमाणात बाजारात येत असून काही कांदा चाळीत आहे.साधारणपणे दिवाळी पर्यंत हा कांदा बाजारात येतो त्यानंतर खरीप कांदा बाजारात टप्प्याटप्प्याने बाजारात येतो. कांद्याच्या लागवडीसाठी रोपवाटीकांमध्ये बियाणे टाकण्यात आले असून खानदेशात सर्वत्र रोपवाटिका दिसू लागल्या आहेत.या रोपवाटिकेत साधारणपणे 20 मे ते 25 जून पर्यंत बियाणे टाकण्यात आले आहे.

ठराविक भागात लागवड

खानदेशात गणपूर ,लासुर,चौगाव, मामलदे, अडावद, वर्डी, माचला, नारोद, खरद, नायगाव, किनगाव, चिंचोली, चुंचाळे, मंगरूळ,गांधली, पिळोदे,दहिवद,साक्री,पिंपळनेर,फोफादे,दुसाने, कर्ले,परसोळे,निजामपूर,जैताने,बोरिस ,कापडने,देवभाने,छडवेल,सामोडे, कढरे ,शहादा, मोड आदी भागत कांद्याची लागवड होते.

पाचशे एकरवर रोपवाटिका

कांदा लागवडीसाठी खानदेशात सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर रोपवाटिका तयार झाल्या आहेत.कांद्याच्या घरगुती बियाण्याची यावर्षी खानदेशात 1100 ते 1500 रुपये किलो प्रमाणे विक्री झाली.तर कंपनीचे बियाणे 1700 ते 2600 रुपये किलो आहे. #रोप तेजीत जाण्याची चिन्हे.....कांद्याचे रोप खानदेशात स्थानिक व सेंधवा आणि मालेगाव भागातून येते.यावर्षी रोप तेजीत विक्री होईल असा अंदाज आहे. सध्या 100 फूट लांबीची गादीवाफ्यावरील सरी 5000 ते 7000 रुपये प्रमाणे विक्री करणाऱ्यांचे दर आहेत.

कांद्याचे रोप महाग राहील म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः बियाणे टाकून रोपवाटिका तयार केल्या असून काहींनी बियाणे विकत आणून रोपवाटिकेत टाकले आहे.

गुलाबराव पाटील,कांदा उत्पादक, गणपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT