collector abhijit raut
collector abhijit raut 
जळगाव

कडक लॉकडाउनसाठी जिल्हाधिकारीच रस्त्यावर...पोलिसांची उडाली धावपळ 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगावसह भुसावळ, अमळनेर येथे लाकडाउन पाळण्यात आला आहे. त्यास नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने प्रतिसाद देत आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्वच रस्ते सामसूम होते. पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसली आहे. असे असले तरी लॉकडाउन कडक करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत रस्त्यावर उतरले होते. 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आजपासून 13 जुलैपर्यंत जळगाव महापालिका, भुसावळ, अमळनेर पालिका क्षेत्रात आजपासून "लोकल लॉकडाऊन' जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केला. त्यात दूध, औषधी, कृषी विषयक बाबी वगळून सर्वच बंद करण्यात आल्याने शहरात सर्वत्र आज सामसूमच होती. एरवी गर्दीने गजबजणारी ठिकाणांवर शुकशुकाट होता. 

कसून चौकशी अन्‌ शुकशुकाट 
शहरातील टॉवर चौक, चित्रा चौक, एस.टी वर्कशॉप, अजिंठा चौफुली, कालिंकामाता चौक, इच्छादेवी चौक, खोटेनगर आदी परिसरात पोलिसातर्फे कडक तपासणी केली जात होती. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पासेस आहेत किंवा नाही, शहरात जाण्याचे कारणे आदी बाबी तपासूनच गरज असेल नागरिकांना शहरात प्रवेश दिला जात होता. 
अनलॉकच्या काळात व्यापारी संकूले बंद असली तरी अत्यावश्‍यक सेवा सुर असल्याने भाजीपाला, किराणा आदी वस्तू घेण्यासाठी सुभाष चौक, दाणाबाजार, टावर चौक, चौबे शाळा, उपनगरातील चौकात नागरिकांची तोबा गर्दी होत होती. पण "लोकल लॉकडाउन'मुळे सर्वच ठिकाणी आज शुकशुकाट दिसून आला. 

जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी 
लोकल लॉकडाउनच्या अंमलबजावण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आज रस्त्यावर उतरले. इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली, दाणा बाजार, सुभाष चौक, महापालिकेच्या परिसरात श्री. राऊत यांनी पाहणी केली. येणाऱ्या जाणाऱ्यांना पोलिस सोडतात का? काय विचारणा करतात याची पाहणी केली. घाणेकर चौकात तगडा पोलिस बंदोबस्त होता. तेथील पोलिसांकडून आढावा घेत लागलीच ते कार्यालयात आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT