corona
corona corona
जळगाव

जळगाव जिल्ह्यात चार महिन्यानंतर नीचांकी रुग्णसंख्या!

भूषण श्रीखंडे


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (corona) संसर्ग कमी होत असून, नव्या रुग्णांची संख्या आता पन्नासच्या टप्प्यात आली आहे. शनिवारी (ता. १९) तर चार महिन्यांतील नीचांकी रुग्णंसख्येचा (Pationt) आकडा आला आहे. शनिवारी ४८ नवीन रुग्ण आढळून आले, तर ११९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू (Death) झाला. (low number of patients after four months in jalgaon district)


जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असून, सध्या दिलासादायक चित्र आहे. शनिवारी प्राप्त अहवालात ४८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार ८८६ झाली आहे, तर ११९ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३७ हजार ८८४ वर पोचला आहे. रिकव्हरी रेट ९७.१८ टक्के झाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची नोंद असून, बळींचा आकडा दोन हजार ५६८ झाला आहे.

...असे आढळले रुग्ण
जळगाव शहर- ११, जळगाव ग्रामीण- पाच, रावेर- एक, अमळनेर, चोपडा, पाचोरा, भडगाव, जामनेर प्रत्येकी दोन, यावल- तीन, जामनेर- तीन, पारोळा- तीन, चाळीसगाव- १६.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT