Minister Gulabrao Patil 
जळगाव

शिवसेनेच्या हिंदूत्वावर बोलण्याचा मनसेला अधिकार नाही-मंत्री पाटील

जिल्हा बँकेच्या निवडणूकी संदर्भात बोलतांना मंत्री पाटील म्हणाले, की सर्वपक्षीय पॅनलबाबत प्रयत्न सुरू आहे.

भूषण श्रीखंडे

जळगावः मनसे स्वःता स्टेबल नसून त्यांनीच वेळोवेळी भूमीका बदलवली आहे. तसेच झेंडे देखील बदलवीले असून शिवसेनेच्या (Shiv Sena) हिंदूत्वा विषयांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (MNS) शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी आज केला.

जळगाव जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेच्या लोकापर्णप्रसंग कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना मंत्री पाटील म्हणाले शिवसेनेची १९६६ पासून हिंदुत्‍वाची भाषा बाळासाहेबांची होती आणि आज ही आहे. परंतू शिवसेनेवर बोलणारे ही त्यांचीच ही पिलावडी आहे. ज्‍यांनी ही बोलण्याची भाषा केली आहे. त्‍यावेळी ते आम्‍हाला वेड्यात काढत होते. त्यात आता बाळासाहेबांच्‍या हिंदुत्‍वाला हिसकावण्याचा प्रयत्‍न काही लोक करत असल्‍याचे देखील आरोप यावेळी मंत्री पाटील यांनी केले.

तर..स्वबळावर लढू

यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणूकी संदर्भात बोलतांना मंत्री पाटील म्हणाले, की सर्वपक्षीय पॅनलबाबत प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेस वेगळी लढणार का याबाबत बैठक झाल्यावर स्पष्ट होईल. सगळ्यांनी बसून सांमजस्‍याने बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्‍न होता. जर एकत्र लढण्यावर एकमत होत नसेल तर शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार आहे.

महापौर बदलवून दाखविण्याचे आव्हान..

शिवसेनेत आलेले काही भाजपचे बंडखोर नगरसेवक पून्हा भाजपात गेले आहे. बहूमत जरी असले तरी तरी त्यांनी महापौर बदलून दाखवावा असे आव्हावन भाजपला केले आहे. त्यात भाजपच्या नगरसेवकांनी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी दोन्ही पक्षांकडे नोंदणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT