jalgaon mumbai travling 
जळगाव

जळगाव ते मुंबई विमान प्रवास; आरटीपीसीआर टेस्‍टची सक्‍ती नाही

जळगाव ते मुंबई विमान प्रवास; आरटीपीसीआर टेस्‍टची सक्‍ती नाही

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोना महामारीने विमान, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ टेस्टची सक्ती रेल्वे व विमान प्राधिकरणाने केली होती. त्याबाबतचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. आता कोरोना महामारी आटोक्यात आली आहे. जळगाव शहरासह महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता सक्तीची असलेली ‘आरटीपीसीआर’ टेस्ट आता निगेटिव्ह असणे गरजेची नाही. प्रवासी विनाटेस्ट जळगाव ते मुंबई विमान प्रवास करू शकणार आहेत.

जळगाव विमानतळावरून जळगाव ते मुंबई, जळगाव ते अहमदाबाद अशी विमानसेवा बुधवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने प्रवासी आपापल्या कामासाठी जळगाव ते मुंबई, जळगाव ते अहमदाबाद अशा सेवेचा लाभ घेत आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आता कोरोनाचे निर्बंध कायम ठेवत सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

मुंबई मनपा आयुक्‍तांचे पत्र

महाराष्ट्रातही ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांच्या आत आहे. तेथे सर्व दुकाने सुरू करण्याचे, मात्र निर्बंध कायम ठेवण्याचे आदेश आहेत. मुंबईच्या महापालिका आयुक्त एल. एस. चाहेल यांनी पत्र काढून महाराष्ट्रातून मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे गरजेचे नसल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT