Agitation
Agitation Agitation
जळगाव

जळगावात १६ मार्केटमधील गाळेधाराकांनी सुरू केले साखळी उपोषण

भूषण श्रीखंडे


जळगाव ः जळगाव महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) मालकीच्या मुदत संपलेल्या (Market) अव्यवसायीक मार्केटमधील गाळेधारकांनी महापालिकेच्या धोरणांच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषणाल आजपासून सुरवात झाली. मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात पिंप्राळा परिसरातील श्री दत्तात्रय मंदीरात दर्शन घेवून बेमुदत साखळी उपोषणाला (Agitation) सुरूवात करण्यात आली आहे.
(jalgaon municipal corporation agitation was started sixteen markets)

गेल्या अनेक वर्षापासून जळगाव महापालिकेच्या मालकिच्या मुदत संपलेल्या १८ गाळ्यांचा प्रश्न प्रलंबीत आहे. त्यात काही संकुलातील गाळेधाराकंनी थकबाकी भरली आहे. तर सोळा संकुलातील गाळेधारकांची थकबाकी बाकी असून या अव्यवसायीक १६ मार्केटबाबत महापालिका प्रशासनान गाळे जप्त करून ते लिलाव करण्याची भुमीका घेतली आहेत. या धोरणा विरोधात १६ मार्केटमधील गाळेधारकांनी यापुर्वीच व्यापार बंद करून आंदोलन दोन महिन्यापूर्वी सुरू केले होते.

साखळी उपोषणाला सुरवात

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. दररोज सोळा संकुलातील गाळेधारक साखळी पद्धतीन उपोषण करणार आहे. आज साडेअकराला जिल्हाधिकारी कार्यालय येथे या उपोषणाची सुरवात झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, उपाध्यक्ष राजेश कोतवाल, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, सचिव तेजस देपुरा आदी उपस्थित होते.


गाळेधारांच्या आहेत या मागण्या..

- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम १५२ नुसार आधीचे सर्व थकित भाडे निर्लेखित करावे.
- जुन्या भाडे दरात १० % भाडेवाढ किंवा डबल भाडे आकारणी करवी आणि त्या दरानेच नूतनीकरण करावे.
- थकीत भाड्यावर मासिक २% शास्ती जी वार्षिक २४% होते ती रद्द करावी.
- नुतन करारनामा ३० वर्षांचा असावा.
- ५ पट दंड रद्द करुन मिळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT