जळगाव

चक्क... सफाई ठेक्यात नगरसेवकाचे नातेवाईक मजूर...१ कोटींचा गैरव्यवहार; कुठे वाचा ! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः येथील महापालिकेने एस. के. कंत्राटदाराला सफाई ठेका देताना अनियमितता केली आहे. या ठेक्यात चक्क काही नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे मजूर म्हणून दाखिले आहे. त्यामुळे या ठेक्यात १ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार झाला आहे, असा गंभीर आरोप महापालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते सुनील महाजन आज पत्रकार केला.

सफाई ठेका घोटाळा बाबत माहिती देण्याबाबत शिवसेनेने पत्रकार परिषद आज घेतली. यावेळी  शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बर्डे यावेळी उपस्थित होते. पुढे बोलतांना महाजन म्हणाले, की महापालिकेत ६ मार्चपासून एस.के.कंत्राटदाराला शहरात सफाईचा ठेका दिला गेला. या कंत्राटदाराला आतापर्यत २ कोटी ४० लाख अदा केले. त्यात १ कोटी २० लाखांचा गैरव्यवहार आहे. या ठेक्यात सत्ताधाऱ्याची भागीदारी आहे. वॉटरग्रेस कंपनीला ज्या नियम अटींवर ठेका दिला होता त्या अटी एस.के.कंत्राटदाराला का लावल्या नाहीत. या कंत्राटदाराने आपल्या मजुरांचे अकौंट बँकेत काढलेले नाही. वाटरग्रेसला ५ वर्षासाठी ७५ कोटी देणार होते, एस.के.कंत्राटदाराला ८५ कोटी देताहेत. १० कोटींचा अपव्यय महापालिका करीत आहे. 
 
कर्मचाऱ्यांची फसवणूक 
एवढा मोठा ठेका विना निविदा दिला गेला आहे. या ठेक्याची निविदा काढायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही. अधिकाऱ्यांचेही यात संगनमत आहे. महापालिका ठेकेदाराला एका मजुराचे वेतन दरमहा १६ हजार रुपये देते. ठेकेदार मात्र ७५०० रुपये कामगाराला देतो.यावरून कामगारांची पिळवणूक होते आहे हे सिद्ध होते. हा ठेका देताना प्रत्येक नगरसेवकाला वीस हजार रुपये दिले जातील असे सांगितले होते. मात्र आजपर्यंत एकाही नगरसेवकाला ही रक्कम मिळाली नाही. 

नगरसेवकांचे नातेवाईक मजूर 
एस.के.कंत्राटदाराच्या ठेक्यात काही नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे मजूर म्हणून आहे. आठ ते दहा नावे मी स्वतः पाहिलेली आहेत. 
महापालिकेतील या गैरव्यवहाराबाबत लवकरच शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून गैरव्यवहाराची माहिती दिली जाईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT