jalgaon lockdown jalgaon lockdown
जळगाव

जळगाव जिल्‍ह्‍यात किराणा, दुधसाठी ठरली वेळ

जळगाव जिल्‍ह्‍यात किराणा, दुधसाठी ठरली वेळ

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्‍याने राज्‍यात कडक लॉकडाउन लावण्यात येणार आहे. तत्‍पुर्वी राज्‍यात किराणा, दुध आणि भाजीपाला विक्रीसाठी निश्‍चित वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्‍याच अनुषंगाने जळगाव जिल्‍ह्‍यात देखील किराणा आणि दुध विक्रीसाठीची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.

कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत. साथीचे रोग कायदा १८९७ च्या कलम दोन, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार हे बदल करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. त्यानूसार केवळ सकाळी ७ ते ११ दरम्यानच किराणा, भाजीपाला, दुध, मांस मिळणार आहेत. १ मे २०२१ च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. आज सायंकाळी आठपासून आदेश लागू राहतील.

या वेळेतच राहणार सुरू

सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत उघडे राहतील. वरील दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ८ पर्यंत मुभा असेल.

नियम शासन पत्रकानुसार

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते. या आदेशामध्ये नमूद केलेल्या गोष्टीं व्यतिरिक्त इतर सर्व अटी व नियम शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसारच असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT