online education 
जळगाव

ऑनलाईन- बिनलाईन...ना अँड्रॉइड फोन, ना नेटवर्क...सांगा कसं शिकायचं? 

रवींद्र कोलते

न्हावी (ता. यावल) : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने अभ्यासक्रमाचे ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरवात केली खरी, परंतु ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी साधन सामग्री आहे का? हा देखील मोठा प्रश्न आहे. ना अँड्रॉइड फोनची उपलब्धता, ना नेटवर्क अशा अनेक अडचणींचा सामना ग्रामीण भागात करावा लागत आहे. 

कोरोनामुळे मार्चपासून शिक्षण संस्था बंद आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक परीक्षा पुढे ढकलल्या. परिणामी, विद्यार्थ्यांचा अभ्यासही थांबला? अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. अनेक खासगी संस्थांनी व्हॉट्सअप ग्रुप, यू-ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाइन क्लासेस सुरू केले आहेत. 

इंटरनेटच नाही तर शिक्षण कसले
राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करणार असल्याचे सांगितले जात असले तरी आज रोजी माहिती तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करता येणे गरजेचे असून, यासाठी स्मार्टफोन, लॅपटॉप, इंटरनेट आधी गोष्टी देखील त्यांच्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. आजही ग्रामीण भाग काही ठिकाणी इंटरनेटची सुविधा लाभापासून वंचित आहे. अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहतील, यात शंका नाही? पण यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचे काय? यामुळे मुलांचे डोळे आणि मेंदू आजारी होत आहे. ऑनलाइन शिक्षण हे आजच्या काळाची गरज आहे. 


ऑनलाइन शिक्षणामुळे आज तरी पालक व विद्यार्थी गोंधळात दिसून येत आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण देण्याचा पर्याय सुरू झालेला आहे. शैक्षणिक संस्थांनीही शिक्षकांच्या माध्यमातून सुरवात करीत आहे. अडचणी जरूर आहे, पण हे डिजिटल इंडियाकडे जाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. 
- पी. एच. महाजन, शिक्षण प्रसारक मंडळ, न्हावी 


नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या अपरिहार्यतेत शिक्षकांना शिक्षक राहून चालणार नाही तर विद्यार्थी व्हावे लागेल. परिस्थितीमुळे ही अपरिहार्यता स्वागतार्ह आणि स्वीकारार्ह आहे आणि आपण तिचा स्वीकार केला पाहिजे. 
- तिलोत्तमा चौधरी, मुख्याध्यापक, शिक्षण प्रसारक मंडळ, न्हावी 


संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT