death.jpg 
जळगाव

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळेच रुग्णांचा मृत्यू; पतितपावन संघटनेचा आरोप

सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोविड रुग्णालयात "पॉझिटिव्ह' असल्यानंतरही ज्या रुग्णांची प्रकृती बरी आहे, अशा रुग्णांचा आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळे मृत्यू होत आहे, असा आरोप पतितपावन संघटनेने केला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या माणसेमारीवर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल देखील त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. आरोग्य यंत्रणा अशा रुग्णांचा एकप्रकारे खूनच करीत असल्याचा आरोप देखील संघटनेकडून करण्यात आला आहे. 
अमळनेर तालुक्‍यातील दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 7 जूनला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर या दोघांची प्रकृती सामान्य रुग्णांप्रमाणे होती. त्यांचे खाणे, पिणे व हालचाली इतर सामान्य रुग्णांप्रमाणे होत्या. दिवसभर या दोघांवर रुग्णालयात उपचार झाले असता त्याच दिवशी रात्री त्यातील एकाचा रात्रीच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती कळविण्यात आली. तर दुसऱ्या रुग्णाचा दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आली. रुग्णांची प्रकृती इतर सामान्य रुग्णांप्रमाणे असताना आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप पतितपावन संघटनेकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. 

पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचा निषेध 
मृत्यूचे सत्र सुरू असताना हरविलेले जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवकांसह लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्यांचा तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. 

सुरक्षा वाऱ्यावर 
अमळनेर तालुक्‍यातील रुग्ण कोविड रुग्णालयात दाखल होते. याठिकाणी सोयीसुविधा मिळत नसल्याने त्या रुग्णाचा मुलगा चार दिवस त्याच्या वडिलांची सेवा करण्यासाठी थेट वॉर्डात कुठल्याही सुरक्षेविना होता. तसेच कोविड रुग्णालयात दाखल कोरोनाबाधित रुग्णांची सेवा त्यांच्या नातेवाइकांनाच करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

राज्य सरकार कारवाई करणार का? 
कोविड रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेमुळे अमळनेरमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल राज्य शासन घेईल का, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांवर राज्य सरकार कारवाई करणार का? असा प्रश्‍न देखील पतित पावन संघटनेकडून उपस्थित केला जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास त्यांच्या नातेवाइकांसह संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला असल्याचे पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब भामरे यांनी दिले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT