जळगाव

खासगी क्वारंटाइन सेंटरमुळे शासकीय रुग्णालयावरील ताण कमी 

देविदास वाणी

जळगाव  : शहरात खासगी क्वारंटाइन सेंटरपाठोपाठ खासगी कोविड रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. यामुळे आर्थिक स्थिती चांगली असलेले रुग्ण खासगी क्वारंटाइन सेंटर, कोविड रुग्णालयांचा आधार घेऊ लागले आहेत. परिणामी, जिल्हा प्रशासकीय यंत्रणेवरील कोरोना संशयित रुग्णांचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारांवर गेली आहे, तर सहा हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात महापालिकेने तीन खासगी क्वारंटाइन सेंटरला परवानगी दिली. महापालिकेचेही क्वारंटाइन सेंटर आहेत. महापालिकेने आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय क्वारंटाइन सेंटर अधिग्रहित केली आहेत. शहरात दिवसेंदिवस वाढणारी संशयित रुग्णांची संख्या पाहता महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पेड बेसीसवर खासगी क्वारंटाइन सेंटरला परवानगी दिली. त्यात जैन समाजातर्फे जितो क्वारंटाइन सेंटर, महेश प्रगती मंडळ, दीपक परदेशी यांच्या संभाजीराजे नाट्यगृहात क्वारंटाइन सेंटर सुरू आहे. 


संभाजीराजे नाट्यगृहात ५० खाटा आहेत. तूर्त त्यात दहा रुग्ण उपचार घेत आहेत. दोन बरे होऊन घरी गेले. जितो क्वारंटाइन सेंटरची मुदत ३० जुलैला पूर्ण होत असल्याने त्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आता एकही क्वारंटाइन नाही. महेश प्रगती मंडळात २२ रुग्ण क्वारंटाइन आहेत. जितो क्वारंटाइन सेंटर बंद होणार असल्याने आता महेश प्रगती मंडळ, संभाजीराजे नाट्यगृहातील क्वारंटाइन सेंटरमध्ये गर्दी वाढणार आहे. 
राज्य शासनाने जिल्ह्यात १२ खासगी कोविड सेंटरला परवानगी दिली आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेले बाधित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेतील. त्यामुळे शासकीय क्वारंटाइन सेंटर व कोविड सेंटरवरील ताण कमी होण्यास मदत होत आहे. 

दृष्टिक्षेपात जिल्हा... 
*एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- दहा हजार २४९ 
* कोरोनामुक्त झालेले- सहा हजार ७३६ 
* उपचार सुरू असलेले- पाच हजार तीन 
* शहरात उपचार घेतलेले- ७७९ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT