Murder 
जळगाव

सावद्यात भर रस्त्यात खुन...लोखंडी रॉडने केला हल्‍ला

प्रविण पाटील

सावदा (जळगाव) : येथील ख्वॉजानगरमध्ये भरवस्तीत प्रौढाचा खून करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव रईस दिलदार चौधरी ऊर्फ डगा असून, तो मूळ गाव लालबाग (मध्यप्रदेश) येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सावदा येथील ख्वॉजानगर भागात वास्तव्यास होता. ही घटना गुरुवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भररस्त्यावर घडली. 

ख्वॉजानगरच्या रस्त्यावर रईस चौधरी उभा असताना दोन, तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवला. डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी रक्तच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व सहकारी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. तसेच जिल्हा पोलिस उप अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान, मृत व्यक्तीचा भाऊ व नातेवाईक घटनास्थळी आल्यावर त्यांनी एकच आक्रोश व संताप व्यक्त केला. हत्यार म्हणून ज्या पाइपाचा वापर हल्लेखोरांनी केला, तो घटनास्थळी पडलेला होता. जळगाव येथील फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी येऊन पाईप ताब्यात घेतला. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.दरम्यान, रईस याच्याविरोधात लालबाग पोलिस ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याचे समजते. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT