shiv bhojan
shiv bhojan 
जळगाव

जळगावात इतक्‍या लोकांनी संपविली शिवभोजन थाली... 

देविदास वाणी

जळगाव : महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात जळगाव शहरातील १६ केंद्रासह जिल्ह्यातील एकूण ३८ शिवभोजन केंद्रावर ३ हजार ५०० थाळ्याचे रोज नागरिकांना वाटप केल्या जात आहे. लॉकडाउनच्या काळात बेघर, निराधारांना फक्त शिवभोजन केंद्रातूनच फुड पॅकेट दिले जाते. ते त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वांत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे शिवभोजन थाळी होय. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध केली. 

कोरोना विषाणू संसर्ग काळामध्ये ही योजना जळगाव जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराश्रित यांच्यासाठी वरदान म्हणून सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या काळात शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपयांवरून आता केवळ 5 रुपये केली आहे. शिवभोजन केंद्राची वेळही सकाळी 11 ते दुपारी 3 अशी वाढविण्यात आली आहे. यामुळे अल्प मिळकत असणाऱ्यांसाठी ही योजना उपयोगी ठरत आहे. 

 
थाळी ऐवजी आता पॅक फुड 
संचारबंदीच्या काळात सोशल डिस्टन्सींग ठेवणे अत्यावश्यक झाल्याने आता या शिवभोजन थाळीचे स्वरूप बदलले असून आता पॅक फूड अर्थात बंद डब्यामध्ये पार्सल स्वरूपात तयार जेवण दिले जात आहे. बंद डब्यामध्ये वाटप करण्यात येणाऱ्या या शिवभोजन थाळीचा वितरण करताना फोटो काढण्यात येतो. प्रत्येक ग्राहकाचे छायाचित्र काढले जात आहे. यामुळे गरजू , गरजवंत व निराश्रित लोकांनाच याचा लाभ मिळत आहे. सोबतच पुरवठादार व अन्य विभागाला हिशेब ठेवण्यासाठी हे छायाचित्र ॲपवर देखील अपलोड केले जात आहे. एक वाटी वरण, एक वाटी भात, दोन पोळ्या, एक वाटी भाजी असे शिवभोजन योजनेचे स्वरूप आहे. 

लॉकडाउनच्या काळातही शिवभोजन केंद्रे आम्ही सुरू ठेवली आहे. गोरगरीब, निराधारांना यामुळे आधार झाला आहे. शिवभोजन केंद्रावर चांगल्या प्रतीचे भोजन दिले जाते. त्यात अनियमितता आढळून आल्यास केंद्र चालकांवर कारवाई केली जाईल. सप्टेंबरपर्यंत थाळीचे दर ५ रूपयेच असतील. 
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी  

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT