जळगाव

सिम ब्लॉक झाल्याचे सांगितले आणि निवृत्त शिक्षिकेचे ‘दिवाळे’ निघाले ! 

रईस शेख

जळगाव : मोबाईलचे सिमकार्ड ब्लॉक झाले असून, ते सुरू करण्यासाठी अ‍ॅपवर जाऊन केवायएसी करा, तसेच आधारकार्ड स्कॅन करायचे सांगत अनिता पाटील या निवृत्त शिक्षिकेला ऑनलाइन पद्धतीने दीड लाखात लुटल्याची घटना घडली. जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

गांधीनगर-ओंकारनगर परिसरातील अनिता पाटील-खैरनार (वय ६२, रा. गांधीनगर, ओंकारनगर) सासूबाईसह वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी दोन्ही अमेरिकेत राहतात. सोमवारी (ता. ९) दुपारी १२.४५ ला अनिता यांच्या मोबाईलवर जिओ कंपनीकडून सिमकार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याचा मेसेज आला. तसेच मोबाईलवरील लिंकवर केवायएसी करा, असेही आलेल्या संदेशात नमूद होते. मोबाईल बंद होईल या भीतीने अनिता पाटील यांनी ज्या क्रमांकावरून संदेश आला होता, त्यावर संपर्क केला. फोनवरून एक व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती, त्याने पाटील यांना मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाउनलोड करावयाचे असल्याचे सांगून त्यावरून दहा रुपये टाकण्यास सांगितले. मात्र, दहा रुपये गेले नाहीत.

यानंतर त्याने आधारकार्ड स्कॅन करण्यास सांगितले. अनिता पाटील यांनी आधारकार्ड स्कॅन केले. आधारकार्ड स्कॅन करताच, अनिता पाटील यांच्या बँकेच्या खात्यावरून दोन वेळा व्यवहार होऊन एक लाख ४९ हजार ९९४ रुपये ऑनलाइन विड्रॉल झाले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर अनिता पाटील यांनी मंगळवारी (ता. १०) सकाळी जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ९८८३७२३२८२ या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक प्रवीण भोसले तपास करीत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT