oxigen plant
oxigen plant 
जळगाव

ऑक्‍सिजन प्लान्ट उभारून रुग्‍णालय बनले स्‍वयंपूर्ण! 

राजेश सोनवणे

जळगाव : कोरोना व्हायरसच्या वाढत्‍या प्रादुर्भावात बाधित रुग्‍णांमधील अनेकांना ऑक्सिजनची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत असल्‍याची समस्‍या महिनाभरापासून राज्‍यात उद्‌भवत आहे. पण, कोरोनाच्या लढाईत दाखल बाधित रुग्‍णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात डॉ. उल्‍हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय स्‍वयंपूर्ण ठरले. हे शक्‍य झाले केवळ येथे उभारण्यात आलेल्‍या ऑक्सिजन प्लान्टमुळेच. 
कोरोना संसर्गाच्या वाढत्‍या प्रादुर्भावात ऑक्सिजनची उपलब्धता हे सर्वांत मोठी आणि महत्त्वाची बाब राहिली आहे. राज्‍यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्‍यानंतर कोरोनाबाधितांचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजनची भासणारी गरज यावरून त्‍याचे महत्त्वही लक्षात आले. अनेक शासकीय वा खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत असून, ऑक्सिजनअभावी अनेक रुग्‍णांचे मृत्‍यूही झाले. पण, अशा स्‍थितीत बाहेरून ऑक्सिजनचा टँक येईल, या भरोशावर न राहता स्‍वतःचा ऑक्‍सिजन प्लान्ट निश्‍चितच संजीवनी ठरला आहे. 

१३ हजार लिटरक्षमतेचा प्लान्ट 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लान्ट तीन वर्षांपूर्वी साकारण्यात आला आहे. अर्थात, २०१७ मध्ये ऑक्सिजन घेऊन येणारा टँकर खराब झाल्‍याने ताटकळत राहावे लागले होते, तेव्हाच प्रशासनाने स्‍वतःचा प्लान्ट उभारणीचा विचार करीत कार्यास सुरवात केली. वर्षभरात प्लान्ट उभारून २०१८ पासून रुग्‍णांसाठी याचा वापर होऊ लागला. तब्बल १३ हजार लिटर द्रवरूपी ऑक्सिजन प्लान्ट आहे. आज कोरोना रुग्णांसाठी हे वरदान ठरत आहे. 

दिवसाआड वापरला जातोय संपूर्ण प्लान्ट 
कोरोनाकाळात ऑक्सिजनसाठी सातत्‍याने उडालेली धांदल व यातून झालेले रुग्णांचे मृत्यू या नित्याच्या झाल्या आहेत. पण, वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा तुटवडा म्‍हणून जाणवला नाही. १३ हजार लिटरक्षमतेच्या प्लान्टमध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन यापूर्वी २६-२७ दिवस वापरला जात होता. पण, सद्यःस्थितीत दिवसाआड संपूर्ण प्लान्टमध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन दोनशे ते अडीचशे रुग्‍णांना वापरला जात असल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 
प्लान्टमधून असा निर्माण होतो ऑक्सिजन 
युनिटमधून अडीचशे रुग्‍णांपर्यंत गॅसरूपी ऑक्सिजन वापरला जात आहे. तो निर्मितीपूर्वी यात द्रवरूपी ऑक्सिजन टाकून ते व्हेपलायझरमध्ये जाऊन तेथून गॅसनिर्मिती होत असते. तेथून ते २२ आणि ३५ एमएम तांब्‍याच्या पाइपलाइनद्वारे रुग्‍णांपर्यंत पोहोचविला जात असतो. 
 
कोरोनाग्रस्त रुग्णांना श्वास घेण्यात मोठी अडचण निर्माण होते. वृद्ध रुग्णांना तर अधिकच त्रास होतो. त्यामुळे त्यांची ऑक्सिजनची मात्रा कमी होऊ नये, यासाठी आम्ही प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहील, याची काळजी घेत आहोत. रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा अत्याधुनिक आहे. 
- प्रमोद भिरूड, रजिस्ट्रार, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT