corona ambu
corona ambu 
जळगाव

अहवाल आला पॉझिटीव्ह...108 रूग्णवाहिकेला केला कॉल पण...

सकाळवृत्तसेवा

जामनेर : शहरातील जामनेर पुरा भागातील 65 वर्षीय वृध्दाचा 108 रूग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने उपजिल्हा रूणालय आवारातच कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. संबंधितांच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रूग्णालय प्रशासनावर पेशंटकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून दोन-तीन तासांपर्यंत गोंधळ घातला. सबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार अरूण शेवाळे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे उपजिल्हा रूग्णालयात धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. 

जामनेरपुरा भागातील मृत 65 वर्षीय रूग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी त्याला खाजगी रूग्णवाहीकेतून उपजिल्हा रूग्णालयात आणले. बाधित रूग्णाला पुढील उपचारासाठी जिल्हा कोविड रूग्णालयात न्यायचे होते परंतु वृध्दाला व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असल्याने 108 रूग्णवाहिकेचा आग्रह होता. मात्र फोन करूनही दोन- तीन तासानंतरही 108 रूग्णवाहिका आली नाही. दरम्यानच्या काळात त्या रूग्णावर कोणतेही प्राथमिक उपचार किंवा तपासणी कोणीही जबाबदार डॉक्‍टरांनी केली नाही. अखेर खाजगी रुग्णवाहीकेतच त्या रूग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक दवाखान्यावर संतप्त होत दांगडो घातला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिक्षण संस्थेचे सचिव जितू पाटील, नगरसेवक बाबूराव हिवराळे आदी घटनास्थळी होते. 
 
तत्काळ चौकशी समिती 
याबाबत प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या चौकशी केले असता त्या म्हणाल्या, घटनेबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली असून तहसीलदार, पालिका मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी अशा चौघांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यावर अंतिम निर्णयासाठी तो तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. 
 
कोविड रूग्णांना योग्य तो न्याय मिळत नसल्याचे सर्व राज्यभरचेच चित्र आहे, वेळेवर 108 किंवा तत्सम शासकीय गाडी वेळेवर मिळत नाही, चार महिन्यांपासून 108 गाडी बाबत अनेक तक्रारी आहेत, गाड्या भाडे तत्वावर लाऊन गैरसोय दुर करा व या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा. 
-आमदार-गिरीश महाजन, जामनेर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT