sukanya yojna 
जळगाव

त्‍यांच्या या निर्णयामुळे गावातील चाळीस मुलीसाठी भविष्‍य उज्‍वल

गणेश खिरडीकर

कुऱ्हा-काकोडा (जळगाव) : मुला-मुलींचे वाढदिवस असले म्हणजे भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्याची जणू प्रथाच सुरू झाली आहे. मात्र, असे असले तरी आजच्या चंगळवादी दुनियेत सामाजिक भान जपणारी माणसेही आढळून येतात. नांदवेल (ता. मुक्ताईनगर) या आपल्या मूळ गावी मुलीच्या वाढदिवसाला खर्च न करता गावातील दहा वर्षांआतील सर्व मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याचा अनोखा उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी राबविला अन् खऱ्या अर्थाने आपल्या सुकन्येचा वाढदिवस साजरा केला. 
खामगाव (जि. बुलडाणा) येथील पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारीपदावर कार्यरत असलेले प्रदीप मुरलीधर पाटील यांचे मूळ गाव मुक्ताईनगर तालुक्यातील नांदवेल आहे. ते नेहमीच समाजहितैषी कार्यक्रम करण्यासाठी अग्रेसर असतात. त्यांची मुलगी सईचा वाढदिवस, त्यात ते पोलिस प्रशासनात मोठ्या हुद्द्यावर असतानासुद्धा त्यांनी मुलीच्या वाढदिवसाला खर्च न करता गावातील सर्व दहा वर्षांआतील मुलींचे टपाल खात्यात सुकन्या योजनेचे खाते उघडून दिले. या वेळी त्यांना पासबुक वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य निलेश पाटील, शालिग्राम पाटील, मुरलीधर पाटील, भागवत पाटील, तुकाराम खिरोळकर, कविता प्रदीप पाटील, तसेच गावातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते. या वेळी सुमारे चाळीस मुलींचे खाते उघडून त्यांना पासबुक देण्यात आले. 

अन्‌ त्‍यांचे भविष्‍य उज्‍वल
टपाल विभागाची सुकन्‍या योजना लाभदायक आहे. परंतु ग्रामीण भागातील नागरीकांना यबाबत पुरेसे अवगत नाही. यामुळे आपल्‍या मुलींचे सुकन्या योजनेचे खाते अद्यापपर्यंत उघडलेले नाही. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी आपल्‍या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्‍य साधून गावातील गरीब घरातील चाळीस मुलींचे खाते उघडून दिले. यामुळे निश्‍चितच त्‍या चाळीस मुलींचे भविष्‍य उज्‍वल बनले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cricket Stadium : अखेर आदेश आला! कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानासाठीची जागा क्रिडा विभागाकडे 33 एकर जमीन हस्तांतरित

"तुझा जेवढा पर डे तेवढंच बोल" सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध अभिनेत्रीची सेटवर काढलेली लायकी ; म्हणाली..

Latest Marathi News Live Update : पुण्यातील अतिक्रण कारवाईत अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

Saundatti Pumped Storage Project : कोल्हा, लांडगा अन् मगरींचे काय होणार? सौंदत्ती प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित; 64 हजार झाडांवर कुऱ्हाड

Commercial Gas Cylinder : हॉटेल-ढाबा व्यावसायिकांना मिळणार सिलिंडर; मागणीच्या २० टक्क्यांपर्यंत गॅस पुरवठा

SCROLL FOR NEXT