जळगाव

नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पुन्हा ‘टार्गेट’

अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांच्या कर्मचाऱ्यांना अमुक अमुक टार्गेट दिले होते.

सकाळ वृत्तसेवा



तळोदा ः अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याशी संबंधित कामांचे, तसेच अनेक प्रकारचे टार्गेट देण्यात येतात. देण्यात आलेली टार्गेट अधिकाऱ्यांच्या (Government officer) क्षमतेचा कस पाहणारे व बऱ्याचदा त्यांच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारी असतात. त्यामुळे बऱ्याचदा ती टार्गेट पूर्ण करताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येते. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना २ व ३ नोव्हेंबरला असेच एक नवीन टार्गेट देण्यात आले आहे. मात्र हे टार्गेट (Target) सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने, दिलेले टार्गेट गाठण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पुढे सरसावले आहेत.


कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण हा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. विपरीत परिस्थिती असतानादेखील जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या विशेषतः आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांचा प्रयत्नाने जिल्ह्यात बऱ्यापैकी लसीकरण झाले आहे. मात्र लसीकरणाची एकंदरीत आकडेवारी बघता नंदुरबार जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत मागे आहे. त्यामुळे जिल्ह्याची लसीकरणाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्ह्यात २ व ३ नोव्हेंबरला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांपासून जिल्ह्यातील बांधकाम, शिक्षण, कृषी, भूजल सर्वेक्षण, सांख्यिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट टार्गेट देण्यात आले आहे.


एरवी अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाशी संबंधित काम एका विशिष्ट मर्यादेत पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात येते, तसेच काहीवेळा कुठल्या ना कुठल्या समित्या दौऱ्यावर येत असतात. त्यावेळी बऱ्याचदा दबक्या आवाजात चर्चा रंगते, की संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागांच्या कर्मचाऱ्यांना अमुक अमुक टार्गेट दिले होते. अधिकाऱ्यांना देण्यात आलेली जवळपास सर्वच टार्गेट त्यांच्या क्षमतेच्या कस पाहणारे व त्यांच्या सहनशीलतेची कसोटी पाहणारेच असतात, असे सर्वत्र बोलले जाते. त्यामुळे टार्गेट शब्द ऐकताच अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा येतो व दिलेली टार्गेट पूर्ण करताना त्यांच्या नाकीनऊ येते. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना २ व ३ नोव्हेंबरला देण्यात आलेले कोरोना लसीकरणाचे टार्गेट जिल्ह्यातील जनतेचा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने, दिलेले टार्गेट गाठण्यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचारी एकदिलाने कामाला लागले आहेत.


सर्वांचा हिरमोड तरीही कामाला
सध्या दिवाळीचे पर्व सुरू असून, अनेक कर्मचाऱ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील लवकरच सुट्ट्या लागणार आहेत. त्यामुळे ऐन सुटीच्या व त्यातल्या त्यात दिवाळीच्या काळातच लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याने जवळपास सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिरमोड झाला आहे. मात्र नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने आवश्यक अशी ही मोहीम असल्याने, मोहिमेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते खालपर्यंतचे सर्वच कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT