जळगाव

पारोळ्यात बेमोसमी वादळी पावसामुळे तडाखा !

संजय पाटील


पारोळा : तालुक्यातील बहादरपुर मंडळातील महाळपुर येथे ता,15 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या बेमोसमी वादळी पावसामुळे (Stormy rain) अनेक घरांची पत्रे (hoom shede) उडाली तर परिसरातील लिंबुची मोठमोठी झाडे वादळी पावसाने कोलमळल्याने बहरलेल्या लिंबु जमिनीवर ( lemons tree )पडल्याने शेतकऱ्यांचे (farmer) लाखोचे नुकसान (Damage) झाले असुन शासनाने पंचनामा करित मदत करावी अशी मागणी महाळपुर येथील सरपंच सुधाकर पाटील यांनी केली आहे.

(parola taluka stormy rain farmer farming hoom big damage)

संचार बंदीमुळे अगोदरच आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपले लिंबू दारोदारी विकावे लागत आहे.मात्र मालास योग़्य भाव मिळत नसल्याने हाती आलेले उत्पन्न या वादळी पावसामुळे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तालुक्यात कोरोनाचे सावट आहे. यामुळे सर्व क्षेत्रात उतरती कळा लागली आहे. त्यातच आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला मान हा तालुक्यात विकावा लागत आहे परिणामी उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झाली असल्यामुळे यंदा देखील शेती परवडेनाशी झाली असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले गेल्या दोन वर्षापासून वरुणाने सर्वत्र थैमान घातल्यास पुढे शेतकऱ्यांसह अनेक उद्योग धंदे बुडाले आहेत.

लिंबू जमीन दोस्त

यंदा समाधानकारक परिस्थिती राहील या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात लिंबूची लागवड केली मात्र तारीख 15 रोजी तोडणीस आलेल्या लिंबू वादळी पावसामुळे जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा निर्माण झाली आहे तालुक्यातील महाडपुर बादरपुर शिरसोदे या परिसरात मोसमी आलेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांची पत्रे उडाली त्यातच परिसरात लिंबूची मोठमोठी झाडे ही वादळामुळे खाली पडल्याने जाणार असलेली लिंबू ते जमिनीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर
अचानक आलेल्या वादळी बेमोसमी पावसामुळे तालुक्यातील शेत शिवारातील तसेच रस्त्यावरील अनेक झाडे कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत तहसिलदार अनिल गवांदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर नुकसानीबाबत विचारले असता रविवारी (ता.१६) तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी तलाठी व मंडळ अधिकारी करतील असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT