जळगाव

'आपला जिल्हा-आपले उपक्रम'... डिजिटल बुकची निर्मिती ! 

सकाळवृत्तसेवा

खिर्डी (ता. रावेर)  : जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 'आपला जिल्हा- आपले उपक्रम' हे ई-पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉकडाउन काळात राबविण्यात आला. 

ई -पुस्तकाची संकल्पना राजुरी (ता. पाचोरा) शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा मुकुंदराव उदावंत व शहापुरा शाळेचे उपशिक्षक पंकज पालीवाल यांनी मांडली. प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आयटी सेलची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत इ - बुक संपादनाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी सांभाळली. संभाजी हावडे यांनी सहकार्य केले. पुस्तक प्रकाशनासाठी तयार असून लवकरच प्राथमिक शिक्षण विभाग त्याचे ऑनलाइन प्रकाशन करणार आहे. 


या पुस्तकात शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. चार भागात टप्प्याटप्प्याने सर्वांसमोर ई पुस्तकाच्या रूपाने मांडणार आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, डायट प्राचार्या मंजुषा क्षीरसागर , माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, निरंतर शिक्षणाधिकारी के. ए. पाटील, मधुकर घायदार यांनी विशेष मार्गदर्शन केले. पुस्तकाच्या निर्मितीसाठी राजेंद्र कोळी , सोनाली साळुंखे, रत्नाकर पाटील, विजया पाटील, कल्पना पाटील, संदीप पवार, राहुल चौधरी, सुनील दाभाडे, मनोहर तेजवानी, अरुण पाटील आंदींनी सहकार्य केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT