Female thief 
जळगाव

मंगळसुत्र लांबविले तरी सराफाला पत्ता नाही;सीसीटीव्हीतून सत्य आले समोर

Raver Crime News: दोन अनोळखी महिलांनी दुकानातून सुमारे दिड लाख रुपये कीमतीचे साडे अडोतीस ग्रॅम काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले.

सकाळ डिजिटल टीम


रावेर: येथील एका सराफाच्या दुकानातून (Goldsmith shop) दोन अज्ञात महिलांनी सुमारे दिड लाख रुपये किमतीचे काळे मणी असलेले साडे अडोतीस ग्रॅम वजनाचे मंगळ सुत्र (Chain) चोरून नेल्याची घटना येथे घडाली. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) पाहिल्या नंतर उघडकीस आला. या बाबत रावेर पोलीस (Raver police) ठाण्यात दोन अनोळखी महिलां (Female thief) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतचे वृत्त असे की येथील डॉ. हेडगेवार ( चौराहा ) चौकातील महालक्ष्मी अलंकार ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात खरेदीच्या बहाणा करून काल (ता.९) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी दुकानातून सुमारे दिड लाख रुपये कीमतीचे साडे अडोतीस ग्रॅम काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले.

सीसी टीव्हीतून सत्य आले समोर..

दुकान बंद करीत असतांना स्टॉक चेक करीत असताना दूकान मालकाला सोन्याचे मंगळसूत्र कमी असल्याचे लक्षात आले. त्याने सीसी टीव्ही फुटेज पाहिले असता दोन महिला ग्राहक बनून आल्या होत्या. त्यांनी दुकान मालक व त्यांचा मुलगा यांचा विश्वास संपादन करून हात चलाखीने त्यांचा विश्वास घात करून सोन्याची पोतचा ट्रे पाहत असतांना त्यातील एक पोत चोरून नेल्याचे दिसून आले.

महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत नरेंद्र भगवान सोनार यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहिती वरून रावेर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलां विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास तपासी सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक करीत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : पंजाबमधील लुधियाना येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT