Woman Surgery 
जळगाव

चार तास शस्त्रक्रिया..आणि पोटातून निघाला तब्बल ७ किलोचा गोळा

महिलेची सोनोग्राफी करून तपासणी केली असता तिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले.

दिलीप वैद्य

रावेर: एका २५ वर्षीय विवाहित महिलेच्या पोटातून एका मोठ्या घमेलीच्या आकाराएवढा तब्बल ७ किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या (Woman Surgery) काढण्यात येथील डॉ. चंद्रदीप पाटील यांना यश आले आहे. आता या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, रुखसाना तडवी (वय २५ वर्षे,रा पाडळा,ता रावेर) या महिलेचे पोट मधून मधून दुखत असे. या महिलेने खानापूर येथील डॉ सुरेश पाटील यांच्याकडे उपचार घेतले. औषधा नंतर थोडे दिवस बरे वाटत असे पण नंतर पुन्हा पोट दुखू लागले. दरम्यान, बाळंतपणात महिलेच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यावल येथील संजीवन हॉस्पिटलचे डॉ. चंद्रदीप पाटील यांनी महिलेची सोनोग्राफी करून तपासणी केली असता तिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले.

चार तास शस्त्रक्रिया..

अखेर आज सकाळी ११ ते दुपारी ३ अशी तब्बल ४ तास शस्त्रक्रिया करून हा ३२० मिलिमीटर बाय २०५ मिलिमीटर आकाराचा व ७ किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आले. हा मोठा मांसल गोळा महिलेच्या गर्भाशयाजवळील बीजांडाजवळ होता त्यामुळे बीजांडासह गोळा बाहेर काढण्यात आला आहे. यावेळी डॉ चंद्रदीप पाटील आणि अनास्थेशीया सर्जन डॉ निलेश पाटील उपस्थित होते. इतक्या मोठ्या आकाराचा आणि वजनाचा गोळा पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

IND vs SL, Test: साई सुदर्शनच्या जागी सरफराजच का? ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होण्यामागचं कारण आलं समोर!

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

Management Admissions: राज्यात बीबीए-बीबीएम-बीएमएस व एकात्मिक एमबीए प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १२ हजार २८२ विद्यार्थ्यांना संधी, ८४८५ जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT