जळगाव

शिरपूर:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत महसूल प्रशासनाची भाऊबीज

संबंधित महिलांनी मांडलेल्या अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले

सचिन पाटील

शिरपूर : कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे झालेली हानी न भरून येणारी आहे. पण यापुढे कुटुंबाची (Family) जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव ठेवा आणि आपल्या मदतीला भावंडाप्रमाणे महसूल प्रशासन (Revenue administration) उभे आहे अशी खात्री बाळगा असे आवाहन प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी केले.

येथील महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आज तालुक्यातील 21 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना साडीचोळी व मिठाई देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार ए.बी.पेंढारकर, मंडळाधिकारी व तलाठी उपस्थित होते.



दिवाळसणाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी भामरे व तहसीलदार महाजन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. संबंधित महिलांनी मांडलेल्या अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. महसूल विभागाने केलेल्या सन्मानाबद्दल महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. पेंढारकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मंडळाधिकारी पी.पी.ढोले, पी.के.मराठे, ए. सी.गुजर, अनिल भामरे, सुरेश बाविस्कर, ए.सी.गुजर, मनीषा गिरासे, व्ही.एम.वाघ व तलाठी संघटनेने संयोजन केले.



यांचा केला सन्मान : आत्महत्याग्रस्त शेतकरी मधुकर पाटील (आढे), नरेंद्र गुजर (वाडी बु), एकनाथ पाटील (घोडसगाव), गणेश कोळी (पिंप्री), यशवंत पाटील (भाटपुरा), रामचंद्र पाटील (कुवे), प्रवीण गुजर (अजनाड), सुभाष मराठे (वाघाडी), नथु अलकरी (कुरखळी), गोविंद पाटील (तऱ्हाडी), भाऊसाहेब पाटील (जुने भामपूर), श्यामराव पाटील (बाळदे), जगतराव शिरसाट (बभळाज), भटू राजपूत (उपरपिंड), महेंद्र महिरे (वनावल), यळबाई मराठे (थाळनेर), देवराम महाजन (शिंगावे), कपिल साळुंखे (थाळनेर), पंकज भदाणे (करवंद) व राजेंद्र गिरासे (पिंप्री) यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT