जळगाव

यावल: काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक जप्त

पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात पाच लाख ८८ हजार रुपयांचा रेशनिंगच्या तांदूळ आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा



यावल : कापडणे- चोपडा- यावलमार्गे गोंदिया येथे काळ्या बाजारात जाणारा शासकीय रेशनिंगचा ३० टन तांदूळ (Government rationing Rice) यावल पोलिसांनी (Police) पकडून ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात ट्रकचालकासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.


शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावलमार्गे गोंदिया येथे जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यावरून सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, हवालदार अस्लम खान, सुशील घुगे, चालक रोहिल गणेश आदींनी यावल-चोपडा रोडवरील हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तीनच्या सुमारास तांदळाने भरलेला ट्रक (एमएच १८, एसी ८४७) येताना दिसून आला. पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात पाच लाख ८८ हजार रुपयांचा रेशनिंगच्या तांदूळ आढळून आला. याबाबत ट्रकचालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्याची कसून चौकशी केली असता, हा तांदूळ पंकज मुरलीधर वाणी (रा. चोपडा) यांच्या सांगण्यावरून संतोष प्रभाकर वाणी, नीलेश राजेंद्र जैन (रा. कापडणे, ता. जि. धुळे ) यांच्या कापडणे येथील गुदाममधून ३० टन तांदूळ भरून भंडारा येथील गीतिका पराबोलिक इंडस्ट्रीज येथे जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालक केदार मुरलीधर गुरव (वय ३८, रा. आकाश गार्डनसमोर, शहादा रोड, शिरपूर) याला ताब्यात घेतले.


दरम्यान, पोलिसांनी कापडणे येथील कल्याणी विनायक इंडस्ट्रीजच्या गुदामाला भेट दिली. तेथे शासनातर्फे परण्यात येणारे बारदान आढळून आले. आतापर्यंत दोन महिन्यांत १७० टन तांदूळ काळ्या बाजारात विक्री केला असल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान यांच्या फिर्यादीवरून पंकज मुरलीधर वाणी, नीलेश जैन, संतोष पाटील आणि केदार गुरव यांच्याविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT