Inauguration of 'Ahimsa Run' initiative by Jito Ladies Wing
Inauguration of 'Ahimsa Run' initiative by Jito Ladies Wing  esakal
जळगाव

Ahimsa Run : जितो लेडीज विंगर्ते २ एप्रिला ‘अहिंसा रन’; एकाच दिवशी 65 शहरांत रन!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो लेडीज विंगतर्फे २ एप्रिलला ‘अहिंसा रन’ ही भव्य मॅरेथॉन (Marathon) आयोजित करण्यात आली आहे. (marathon Ahimsa Run by Jain International Trade Jito Ladies Wing organized on 2 April jalgaon news)

रविवारी (ता. २) तीन, पाच व दहा किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन असेल. अहिंसा रन ६५ शहरात एकाच दिवशी एकाच वेळी घेण्यात येणार असून, शांती व अहिंसेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने ‘अहिंसा रन’च्या लोगोचे शुक्रवारी (ता. ३) अनावरण करण्यात आले.

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, उपअधीक्षक संदीप गावित, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समुहाचे अशोक जैन, मुख्य प्रायोजक प्रीतम रायसोनी, रमेश जैन, अजय ललवाणी, रजनीकांत कोठारी, राजेश चोरडिया, डॉ. परेश दोशी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

‘अहिंसा रन’मध्ये सर्वांनी सहभागी होऊन अहिंसेचा प्रसार करावा, असे आवाहन जितो लेडीज विंग अध्यक्षा निता जैन यांनी केले. डॉ. सोनाली जैन व सुलेखा लुंकड यांनी अनावरण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT