Gold 
जळगाव

जळगावः ‘धनतेरस’ला ३० किलो सोन्याची विक्री

कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी सर्वच सणांची चमक कमी होती. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे.

देविदास वाणी




जळगाव ः जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सूवर्णबाजारपेठ ( Jalgaon Gold market) प्रसिद्ध आहे. यंदा कोरोनानंतर (Corona) प्रथमच सर्व अनलॉक होऊन नागरिक दिवाळी साजरी करीत आहेत. चांगला पाऊस झाला आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी कंपन्यांमध्ये सर्वांचाच पगार हाती पडला आहे. यामुळे बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची धूम सुरू आहे. मंगळवारी धनत्रयोदशीचा (Dhanteras) मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदी केली. एकाच दिवसात ३० किलो सोने खरेदी ग्राहकांनी केली. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.



गेल्या वर्षी कोरोना होता. यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी कमी आहे. सराफ बाजारात गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२०) सोन्याचे दर ५१ हजार २०० ते ५१ हजार ३०० असे होते. यंदा सोन्याचे दर ४८ हजार ५०० ते ४८ हजार ३०० रुपये आहेत. वर्षभराच्या कालावधीतील घसरणीचा ट्रेंड लक्षात घेतला, तर सोने सुमारे तीन हजार रुपयांनी कमी झाले आहे. हीच संधी साधून गुंतवणूकदार, सर्वसामान्य नागरिकांनी सोने खरेदीला महत्त्व दिले आहे.



कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे गेल्या वर्षी सर्वच सणांची चमक कमी होती. राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्याने बाजारपेठ पूर्वपदावर आली आहे. सराफ बाजार आता पूर्वीच्या तुलनेत सावरला आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सोने व चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकदेखील आतुर आहेत. धनत्रयोदशी व पाडव्याचा मुहूर्त मिळून यंदा विक्रमी सोने खरेदी होईल, असा सराफ व्यावसायिकांचा अंदाज आहे. धनत्रयोदशीला ग्राहक सोन्याचे दागिने, सोन्याचा तुकडा किंवा शिक्के खरेदीला पसंती देतात.

सोने व चांदीच्या दरामध्ये सध्या घसरणीचा ट्रेंड अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने व चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी गुंतवणूकदारांसाठी चालून आलेली आहे. जळगाव सराफ बाजारात मंगळवारी सकाळी व्यवहारांना सुरवात झाली, तेव्हा २४ कॅरेट सोन्याचे दर ४७ हजार ८०० ते ४७ हजार ९०० रुपये (३ टक्के जीएसटी वगळून) प्रतितोळा, तर चांदीचा दर सुमारे ६७ हजार रुपये प्रतिकिलो असा नोंदविले गेला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक व्यवहारांची स्थिती आगामी काही दिवस अशीच कायम राहील, असा अंदाज असल्याने सोन्याचे दर एक ते दीड हजारांनी, तर चांदीचे दरही दोन ते अडीच हजार रुपयांनी वर-खाली राहू शकतात.


ग्राहकांच्या पसंतीचे कलेक्शन उपलब्ध
रतनलाल सी. बाफना ज्वेलरी शोरूममध्ये लाइटवेट ज्वेलरी, पेशवाई ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, नक्षी ज्वेलरी, रोज गोल्ड, टर्की ज्वेलरी, इटालियन, छिलवा, कास्टिंग, ब्लॅक टेम्पल, कलकत्ती मीना ज्वेलरी, अजंता एलोरा, वेडिंग कलेक्शन अशा अनेक प्रकारात सुंदर डिझाइन्स खास दीपावली पर्वावर उपलब्ध असून, त्याला ग्राहकांची चांगली मागणी असल्याची माहिती रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक मनोहर पाटील यांनी ‘सकाळ’ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT