जळगाव

मनपा टीम, जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी ‘दोन हात’ 

सचिन जोशी

जळगाव  : महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांतच कोरोनाचे संकट आले. हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करताना महापालिकेची टीम, जनतेच्या सहकार्याने हा लढा देऊ शकलो, असे मत महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केले. 


मार्च महिन्यात महापौरांचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चे प्रसंगी त्या बोलत  होत्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते. गेल्या वर्षभरातील कार्यकाळाबद्दल महापौरांनी भावना व्यक्त केल्या. 

कोरोना संकटात काम 
महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही दिवसांत कोरोनाचे संकट आले. शहरात पहिला रुग्ण आढळल्यापासून त्याच्या निवासस्थानी भेट देण्यापासून परिसर निर्जंतुक करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्राला भेट, टप्प्याटप्प्याने यंत्रणा वाढविणे, कोविड सेंटरमध्ये स्वत: जाऊन बाधितांसाठी योगाचे धडे आदी कार्य जीव धोक्यात घालून केले. महापालिकेतील आरोग्य यंत्रणा व अन्य टीमचे अहोरात्र परिश्रम, जनतेच्या सहकार्याने अत्यंत बिकट स्थितीतही कोरोनाशी ‘दोन हात’ करू शकलो, असे त्या म्हणाल्या. 

पाणीप्रश्‍न सोडविण्यावर भर 
शिवकॉलनी, सुप्रीम कॉलनीतील पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून होती. त्याठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून तिथला पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यात नुकतेच यश आले आहे. या भागातील नागरिकांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, तीच आपल्या कामाची पावती आहे. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण, हॉकर्सचा प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष दिले. गणेश कॉलनी मार्गावरील भररस्त्यातील प्रार्थनास्थळाचे अतिक्रमण स्थळाच्या विश्‍वस्तांशी चर्चा करून निर्विघ्नपणे काढले. या काळात काही कामे करता आली, ती कोणताही पक्षीय भेद न करता मनापासून केली. विरोधकांच्या प्रभागांमध्येही कामांना न्याय दिल्याचा दावा त्यांनी केला. 


‘अमृत’चे नियोजन चुकले 
या सर्व कामांबद्दल सकारात्मक बोलताना महापौर व कैलास सोनवणेंनी ‘अमृत’च्या कामाचे नियोजन चुकल्याचेही मोठ्या मनाने मान्य केले. शहराचे विविध भाग करून टप्प्याटप्प्याने त्यात योजनेचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. या कामाचे नियोजन आधीच्या सत्ताधारी गटाच्या काळात झाले असले, तरी आम्ही त्याची जबाबदारी नाकारत नाही. नागरिकांची रस्त्यांबद्दलची ओरड रास्त असल्याचे ते म्हणाले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT