जळगाव

जळगाव वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय केंद्र सरकारच्या कार्यक्षमता चाचणीत सर्वोत्तम 

राजेश सोनवणे

जळगाव: केंद्र सरकारच्या निती आयोगाने जिल्हा रुग्णालयांच्या कार्यक्षमता चाचणीत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. याबाबतचे पत्र रुग्‍णालयाला प्राप्त झाले आहे. रुग्णालयात केलेल्या चांगल्या कामांची माहिती येत्या दोन आठवड्यांत निती आयोगाने अधिष्ठात्यांकडे मागितली आहे. 

केंद्र सरकारच्या निती आयोगाने देशातील सर्व जिल्हा रुग्णालयांची कार्यक्षमता चाचणी केली होती. त्याचा उद्देश देशातील प्रत्येक रुग्णालयाबाबत मूलभूत माहिती तयार करणे, तसेच रुग्णालयांच्या सेवेमध्ये श्रेणीवर्धन करणे होते. या चाचणीत रुग्णालयांना तीन प्रकारात विभागण्यात आले. यात लहान (२०० पेक्षा कमी खाटा), मध्यम (२०० ते ३०० खाटा) व मोठे रुग्णालय (३०० पेक्षा अधिक खाटा) या निकषाच्या आधारे ही चाचणी घेण्यात आली. याव्यतिरिक्त निकषांचे ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन प्रवर्गही होते. प्रवर्ग ‘अ’मध्ये ज्या निकषांची पूर्तता करणे बहुतांशी सरकारच्या हातात होते, असे निकष, तर प्रवर्ग ‘ब’मध्ये ज्या निकषांची पूर्तता करणे केवळ रुग्णालय प्रशासनाच्या हातात होते असे निकष होते. 

जळगावचे रुग्‍णालय ‘ब’ वर्गात 
या चाचणीअंती महाराष्ट्र राज्यातील पाच रुग्णालये आली. त्यात दोन रुग्णालयांनी प्रवर्ग ‘अ’च्या निकषात, तर प्रवर्ग ‘ब’मध्ये तीन रुग्णालयांनी सर्वोत्तम कामगिरी केल्याचे निष्पन्न झाले. यात ‘अ’मध्ये उपजिल्हा रुग्णालय, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग), जिल्हा रुग्णालय, सातारा, तर ‘ब’ प्रवर्गात ठाणे रुग्णालय, नगर व जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा समावेश झाला आहे. 

रुग्‍ण तपासणीच्या संख्येवर प्रावीण्य 
यात कुडाळ हे छोटे रुग्णालय या कॅटेगरीत, त्यानंतर सातारा, ठाणे, नगर हे २०० ते ३०० खाटांच्या क्षमतेचे, तर एकमेव जळगावचे शासकीय रुग्णालय हे ३०० पेक्षा जास्त खाटांच्या क्षमतेचे म्हणून केंद्र सरकारच्या चाचणीत आले असून, जळगावने रुग्णांच्या तपासणी संख्येवर प्रावीण्य मिळविले आहे. याबाबतचे पत्र निती आयोगाचे अतिरिक्त सचिव राकेश सरवाल यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव प्रदीपकुमार व्यास यांना पत्राद्वारे कळविले आहे. 


निती आयोगाचे पत्र प्राप्त होताच, डॉक्टरांसह वैद्यकीय यंत्रणेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. केलेल्या श्रमाचे केंद्राकडून कौतुक झाल्याने प्रोत्साहन मिळाले आहे. 
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT