A minor girl Pregnant from abuse esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; संशयितास पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : धरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १५ वर्षीय अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा खुलासा झाला होता. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीवरून संशयित विक्की रवींद्र कोळी (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे.

धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख करून विक्की रवींद्र कोळी (वय ३५) गैरफायदा घेत अत्याचार केला होता. गेल्या सहा महिन्यापासून तो, सतत मुलीचे शोषण करत असल्याने पिडीता गर्भवती राहिली. (Minor girl pregnant from abuse Suspect in police custody Jalgaon Crime News)

हेही वाचा : असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या भावाला मारेल, अशी धमकी पीडित मुलीला दिली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

दाखल गुन्ह्यात पोलिस पथकाने विक्की रवींद्र कोळी याला अटक करून आज जिल्‍हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयिताला पाच दिवस पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेशित केले. ॲड. सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन लॅब, फक्त ४९ अधिकारी, अन्नसुरक्षेचं FDAसमोर आव्हान; भेसळखोरांवर कारवाया वाढल्यानं यंत्रणेवर ताण

Sagreshwar Wildlife Sanctuary : 'सह्याद्री'च्या कुशीत खुललं पर्यटन! कडेगावातील सागरेश्वर, चौरंगीनाथ पर्यटकांना खुणवतोय; पावसाळ्यात घ्या मिनी महाबळेश्वरचा अनुभव

'स्प्लेंडर फिरवतो माझा जानू...' ट्रेडिंग गाण्यावर कमळी मालिकेतील कलाकरांचा भन्नाट डान्स, Viral Video

Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर शिक्षक बँकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; शिक्षिकाही एकमेकींच्या अंगावर धावल्या

SCROLL FOR NEXT