abduction of girl esakal
जळगाव

Jalgaon : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची (Abduction) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (minor girl was abducted Jalgaon Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त, शहरापासून जवळच वास्तव्यास असणाऱ्या दोन सख्या बहिणी ह्या सोमवार, २० रोजी कपडे घेण्यासाठी शहरात आल्या. कपड्यांची खरेदी झाल्यावर लहान बहिणीला एका बस स्थानकावर सोडून मी शाळेत जाऊन येते असे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सांगून गेल्या. मात्र त्यादिवशी ती घरी परतलीच नाही. त्यावर घरचांनी परिसरासह शहरातील दर्गा परिसर, धुळे रोड, भडगाव रोड, हिरापूर रोड व नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. मात्र सदर मुलगी मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञाताने मुलीच्या आज्ञापनाचा फायदा घेऊन फूस लावून पळवून नेले असावा अशी पीडितेच्या वडिलांना खात्री झाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT