जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गृहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या २८ वर्षीय गृहिणीचा रविवारी (ता. १५) विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली.
पीडिता आजादनगरातील कब्रस्थान जवळून सायंकाळी ७.३० वाजता पायी जात असताना आसिफ उर्फ गंधा फैजल याने महिलेचा पाठलाग करून बळजबरी तिचा हात पकडला. तिच्याशी अंगलट केली. महिलेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आसिफ फैजल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.