Ongoing repair of road near Collectorate.  esakal
जळगाव

Jalgaon News : पूजन झालेल्या रस्त्याची दुरुस्ती; महापालिकेने दाखविली प्रथमच तत्परता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे तरुणांनी पूजन केल्यावर महापालिकेने शुक्रवारी (ता. २८) तत्परता दाखवून या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती केली. (Municipal Corporation repaired potholes jalgaon news)

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या गंभीर आहे. त्याबाबत आता विविध स्तरांवर आंदोलनेही सुरू आहेत. शहरातील तरुणांनी एकत्र येऊन गुरुवारी (ता. २७) आंदोलन केले होते.

तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्याचे हळद-कुंकू वाहून पूजन करून महापालिकेने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेच्या बांधकाम विभागाने तत्परतेने या आंदोलनाची दखल घेतली व २४ तासांत कार्यवाही करून शुक्रवारी दुपारी तो खड्डा बुजविला.

पावसाळा असल्याने डांबरीकरण करता येत नसल्याने त्या ठिकाणी मुरूम टाकून खड्डा बुजविण्यात येऊन वाहतुकीसाठी रस्ता चांगला करण्यात आला. महापालिका निदान आंदोलनाची दखल घेऊन जनतेसाठी काम करीत असल्याचे समाधानही नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Adani: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी झाले आशियातील नंबर 1 श्रीमंत! कारण काय? किती झाली संपत्ती

Best Jobs 2026 : कोटींचा पगार, मोफत घर-जेवण अन् 1 वर्षात गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड मिळणार! 'ही' कंपनी देत आहे अनोखी नोकरी

Video : दीप आणि ज्योतीवर कोसळणार मोठं संकट ! मालिकेतील नव्या ट्विस्टसाठी प्रेक्षकही उत्सुक

ST Bus Maharashtra : एसटी बसस्थानकांबाबत मोठे निर्णय; १ जूनपासून स्वच्छतागृह मोफत, ८ हजार नव्या बस, ३० रुपयात नाष्टा, मंत्र्यांची घोषणा

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

SCROLL FOR NEXT