Bhushan Bhadane esakal
जळगाव

Jalgaon News | पराभवाचे दुखणे खेळाच्या मैदानात काढणे हास्यास्पद : भूषण भदाणे

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : निवडणूक मैदानातील पराभव जिव्हारी लागल्याने आपले दुखणे तरुणाईच्या मैदानी खेळास टार्गेट करून काढण्याचा प्रयत्न भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चालविला असून, असले खेळ चालविल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला आहे.

प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात आमदार चषकच्या निमित्ताने लागलेले फलक भाजप व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी काढण्याचा प्रयत्न केल्याने भूषण भदाणे यांनी हा पलटवार केला आहे. या संदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे, की विद्यार्थी व तरुणांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. (NCP District President Bhushan Bhadane Taunting statement on BJP and Yuva Morcha workers

Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

दोन वर्षे कोरोनामुळे मैदानी स्पर्धा बंद होत्या. आता कोणतेही निर्बंध नसल्याने खेळाला हातभार व प्रोत्साहन मिळावे, खेळाडूंच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, तसेच राज्यस्तरीय खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा नव्या खेळाडूंना व्हावा, यासाठी या स्पर्धांचे आयोजन आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने तालुका क्रिकेट असोसिएशनने केले असून, यात कोणतेही राजकारण नाही, विशेष म्हणजे या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पक्षिय भेदच नसल्याने विविध पक्षांचे कार्यकर्ते खेळाडू म्हणून आनंदाने खेळत आहेत, असे असताना भाजप आणि युवामोर्चा कार्यकर्त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून केवळ दिशाभूल करण्यासाठी हे कृत्य केले आहे.

प्रत्यक्षात प्रताप महाविद्यालयाच्या मैदानात आतापर्यंत अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धा झाल्या. मात्र कुणीही यास टार्गेट न करता उलट प्रोत्साहनच दिले आहे. मात्र खेळाबद्दल आदर नसलेल्या कार्यकर्त्यांनी दूध संघ निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला म्हणून असे खालच्या स्तराचे राजकारण केले आहे. मात्र स्वतःला युवा म्हणविणाऱ्यांनी युवांच्याच खेळाचा अनादर करणे त्वरित थांबवावे, अन्यथा इतर डावपेचाच्या खेळात आम्हीही चांगलेच पारंगत आहोत, असा इशारा भदाणे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT