Opposition leader Ajit Pawar, state president Jayant Patil, MLA Anil Patil etc. participated in the NCP road show esakal
जळगाव

Jalgaon NCP Road Show : अमळनेरला राष्ट्रवादीच्या ‘रोड शो’ने वेधले लक्ष! दिग्गजांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

NCP Road Show : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार अनिल पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६) सकाळी शहरात भव्य रोड शो केला. मिरवणुकीच्या मागे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि एकनाथ खडसे चारचाकीमधून येत होते. (NCP road show attracted attention to Amalner presence of ajit pawar jayant patil jalgaon political news)

आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानापासून सकाळी साडेनऊला खुल्या जीपमधून मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणुकीच्या पुढे मोटरसायकल रॅली, महिलांचे ढोलपथक, त्यांच्या मागे वारकरी पथक होते.

‘शरद पवार आगे बढो’, ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’, ‘एकच वादा अजित दादा’, ‘जयंत पाटील साहेब आगे बढो’, ‘एकच वादा अनिलदादा’ आदी घोषणा देण्यात आल्या.

मिरवणूक अरिहंत चौक, तहसील कार्यालय, महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ पोहचली. येथे सात ते आठ जेसीबीच्या साहाय्याने रोड शोवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कार्यकर्त्यांना मिळाली ऊर्जा

लोकसभा व विधानसभा निवडणुकांना वर्ष उरले असले तरी या रोड शोमुळे निवडणुकीचा बिगूलच राष्ट्रवादीने फुंकला असल्याचे चित्र होते. यामुळे मात्र कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

शहर झाले राष्ट्रवादीमय

१४ वर्षानंतर प्रथमच खासदार शरद पवार अमळनेरात आले होते. समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार असल्याने शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तसेच तालुक्यातील गावांमध्ये पदाधिकाऱ्यांकडून स्वागताचे बॅनर तसेच झेंडे लावलेले होते. यामुळे शहर मात्र राष्ट्रवादीच्या रंगात रंगले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT