curfew 
जळगाव

थर्टी फस्ट साजरी करताय ! साडेदहा पर्यंतचं हाॅटेल, बार सुरू राहणार 

रईस शेख

जळगाव :  सरत्यावर्षाला निरोपदेत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईसह, हॉटेल, ढाबे विवीध व्यवसायीक संस्था सज्ज असतांना कोरोना पादृर्भावामुळे यंदा आनंदावर विरजण पडणार आहे. जिल्‍ह्‍यात रात्री ११ नंतरची कठोर संचार बंदी लागू झाली असून प्रत्येक रस्त्यावर तपासणी पथकांसह नाकाबंदी लावण्यात आली आहे. एकंदरीत रात्रभर दारु पिणाऱ्यांचे स्वप्न यंदा पुर्ण होणार नसून रस्त्यावर बाहरे पडताच पेालिसांचा दंडूका स्वागताला सज्ज राहणार आहे. 

यंदाच्या वर्षी कोरोनामुळे लग्न समारंभासह विवीध धार्मीक, सामाजीक कार्यक्रम रद्द झाले. आता थर्टीफर्स्टच्या कार्यक्रमावरही कोरोनाचे संकट ओढवले आहे. कोरोनाची खबरदारी घेत आनंद साजरा करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरवेळी पहाटेपर्यंत परवानगी असते. मात्र यंदा रात्री १०.३० पर्यंत वेळेची मर्यादा असल्याने तरुणाईसह हॉटेल व्यावसायिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दुसरीकडे कोरोना नियंत्रणासह अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून पूर्वसंध्येला कर्मचारी बंदोबस्तावर रवाना करण्यात आले आहे. 

घरीच राहून साजरा करा थर्टी फर्स्ट साजरा करा 
नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागतघरीच साधेपणाने साजरे करावे, ६० वर्षा वरील नागरीकांनी व १० वर्षा खालील मुलांनी सुरक्षीततेच्या व आरोग्याच्यादृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, धार्मीक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करु नये, नियमांचे पालन करत आनंदाने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आवाहन केले आहे. 

संचारबंदीमुळे हिरमोड 
जिल्हयात सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत दुसरीकडे संचारबंदी यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे निवडणुकांमुळे ग्रामीण भागांत हॉटेलवर चांगलीच गर्दी होणार असून प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे. 

जिल्ह्यातील बंदोबस्त असा 

नाकाबंदी पॉईंट - ५८ ठिकाणे 
फिक्स पॉईंट बंदोबस्त - १२६ ठिकाणी 
गस्तीवरील पेट्रेालींग वाहने - ४५ 
डंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाई पथके - ३५ 

नियुक्त बंदोबस्तावरील अधीकारी कर्मचारी 
पेालिस अधीकारी -९३ 
पेालिस कर्मचारी -६२७ 
होमगार्ड जवान -५७८ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagar Panchayat vs Municipal Council: डोकं फिरवणारं कन्फ्युजन! नगरपंचायत vs नगरपरिषद… नेमका फरक काय? सरळ भाषेत तुलना

Washing Towels Tips: दर आठवड्याला टॉवेल धुणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या एका क्लिकवर

Nashik Municipal Election : तीन वर्षांनंतर नाशिक जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुका; महायुती-महाआघाडीचे काय होणार?

MCA Election Update : मतदार यादीतील घोळ समोर आल्यानंतर निवडणुकीला स्थगिती, उद्या हायकोर्टात होणार सुनावणी

Vidarbha Politics: विदर्भातील शहरी क्षेत्रावर प्रभाव कोणाचा?; भाजपा व काँग्रेसमध्येच खरी लढाई; दिग्गज नेत्यांचा कस लागणार..

SCROLL FOR NEXT