Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon Municipal Commissioner : मनपा आयुक्तांवरील अविश्‍वास प्रस्ताव स्थगित; महासभेस नगरसेवक अनुपस्थित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipal Commissioner : शहर महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावरील अविश्‍वास प्रस्ताव स्थगित करण्यात आला. प्रस्तावाला पाठिंबा देणारे भारतीय जनता पक्षासह इतर पक्षांचेही नगरसेवक अनुपस्थित राहिले.

कोरमअभावी सभा अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी जाहीर केले. अवघ्या २० मिनिटांत सभा आटोपली. (no confidence motion against Municipal Commissioner Dr Vidya Gaikwad was suspended jalgaon news)

महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड विकासकामे करीत नाहीत, असा आरोप करीत भाजपचे नगरसेवक ॲड. अश्‍विन सोनवणे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते. त्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने थेट आयुक्त डॉ. गायकवाड यांच्यावर अविश्‍वास ठराव आणण्यात आला. त्याला भाजपसह शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट व एमआयएमने पाठिंबा दिला होता. त्यामुळे जोरदार राजकीय वातावरण पेटले होते.

भाजप नगरसेवकांनी आणलेल्या अविश्‍वास ठरावामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नगरसेवकांनी हा अविश्‍वास ठराव दाखल केल्याने मंत्र्यांचीही कोंडी झाली होती.

अखेरीस सोमवारी (ता. २४) मंत्री महाजन, मंत्री पाटील, भाजपचे नगरसेवक व महापालिका आयुक्त डॉ. गायकवाड यांची अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. तीत आयुक्त व नगरसेवक यांच्यात समझोता झाला आणि अविस्ताव प्रस्ताव मागे घेण्याबाबत निर्णय झाल्याचे मंत्री महाजन यांनी जाहीर केले.

कोरमअभावी सभा तहकूब

आयुक्तांवर दाखल झालेल्या प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी मंगळवारी (ता. १) महापौर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकराला सभा सुरू झाली. महापौर महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणारे भाजपचे नगरसेवक डॉ. सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, रजनी अत्तरदे, महेश चौधरी व शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका ज्योती चव्हाण उपस्थित होत्या. नगरसेवक सोनवणे यांनी कोरमअभावी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला ॲड. हाडा यांनी पाठिंबा दिला. आयुक्तांनी आपला लेखी खुलासाही सादर केला. महापौरांनी नगरसेवकांच्या प्रस्तावानुसार कोरमअभावी सभा अनिश्‍चित काळासाठी तहकूब करण्याची घोषणा केली.

आयुक्तांच्या बदली अर्जामुळे तडजोड?

महापालिकेच्या आयुक्त डॉ. गायकवाड, मंत्री महाजन, मंत्री पाटील यांची अजिंठा विश्रामगृहावर तब्बल तासभर चर्चा झाली. या वेळी आयुक्त डॉ. गायकवाड यांनी बदली अर्ज मंत्र्यांकडे दिला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच अविश्‍वास ठरावाबाबत तडजोड झाली असल्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘त्या’ कर्माची फळे भोगतील : डॉ. सोनवणे

अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणारे नगरसेवक डॉ. सोनवणे यांनी सभा तहकूब झाल्यावर समाधान व्यक्त केले. पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार प्रस्तावाबाबत निर्णय घेतला आहे. आम्ही मागणी केल्याप्रमाणे विकासकामे वेगाने करण्याचे आयुक्तांनी मंत्र्यांना आश्‍वासन दिले.

त्यामुळे हा प्रस्ताव स्थगित केला आहे. आमचा आयुक्तांवर व्यक्तिगत राग नाही, तर त्यांच्या कामावर राग आहे. भगवद्‍गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काम चांगले केले नसेल, तर त्या आपल्या कर्माची फळे भोगतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT