Jalgaon accident news esakal
जळगाव

Jalgaon News : पाचोरा- जळगाव रस्ता ठरतोय जीवघेणा!; अपूर्ण कामामुळे अपघात

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील पाचोरा ते जळगाव रस्ता ‘मौत का कुवा’ बनला असून, अपघात व हानी नित्याचीच असल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने क्षत्रिय ग्रुपने यासाठी पुढाकार घेत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या ११ डिसेंबरला सर्व समावेशक बैठकीचे आयोजन केले आहे. पाचोरा - जळगाव रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण न केल्यास होणाऱ्या परिणामांना संबंधित कंपनी जबाबदार राहील, असा पवित्रा क्षत्रिय ग्रुपने घेतला आहे. (Pachora Jalgaon road is becoming dangerous Accidents due to incomplete work jalgaon Latest Jalgaon News)

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

पाचोरा - जळगाव रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर या रस्त्याला लागून असलेल्या सर्व गावातील नागरिक, वाहनधारक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी कमालीचे आनंदले होते. काम मोठ्या गतीने सुरू करण्यात आले. परंतु गेल्या दीड वर्षांपासून रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीने काम अर्धवट सोडून गाशा गुंडाळला आहे. काम अर्धवट असल्याने प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असून, अपघात व जीवितहानी नित्याची झाली आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे दुर्दशा दिवसागणिक वाढत असून, प्रचंड त्रास व मनस्ताप नागरिकांना व प्रवाशांना सोसावा लागत आहे. अनेकदा अधिकारी व कंपनीच्या अभियंत्यांशी संपर्क साधून या संदर्भात तक्रारी व न्यायाची मागणी केली.

परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हजारो नागरिकांच्या जीविताशी जीवघेणा खेळ खेळला जात आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा पवित्र घेण्यात आला असून, यात पाचोरा येथील क्षत्रिय ग्रुपने पुढाकार घेऊन आंदोलनाची डरकाळी फोडली आहे.
आंदोलनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी येत्या रविवारी (ता. ११) दुपारी चारला हुतात्मा स्मारकात बैठक होणार आहे. बैठकीस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवासी, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, वाहनचालक यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन क्षत्रिय ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT