Pandurang Patil teaching school students at Panchpraneswar temple.  esakal
जळगाव

Inspirational News : ‘स्कॉलर’ मुले घडविणारा निवृत्त अधिकाऱ्याचा ज्ञानयज्ञ; कासोद्याचे अनोखे ‘ज्ञान’मंदिर!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ऐसी कळवळ्याची जाती

करी लाभेविण प्रीती

संतांच्या या उक्तीप्रमाणे जगणारे अनेक लोक आहेत. कृषी विभागातून निवृत्तीनंतर खरंतर पांडुरंग अण्णांना आरामाने आयुष्य घालविता आले असते. (pandurang Patil teacher teaches student in Temple For 20 years without any fees jalgaon news)

मात्र, आपल्या ज्ञानाचा गावातील मुलांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी लाभ कसा होईल, या हेतूने त्यांनी मंदिरातच वर्ग सुरू केले. विज्ञान, गणिताचे मुलांना ते धडे देऊ लागले आणि अण्णांच्या या ज्ञानमंदिरातून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणारी मुले घडू लागली.

पांडुरंग हरी पाटील आडगाव (ता. एरंडोल) येथील मूळ रहिवासी. ‘अण्णा’ म्हणून ते या परिसरात प्रचलित आहेत. कृषी विभागात नोकरी केल्यानंतर २० वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. २००३ मध्ये पांडुरंग अण्णा निवृत्त होऊन कासोद्यात स्थायिक झाले.

अर्जुननगर परिसरातील महादेव मंदिरात त्यांनी निवृत्तीनंतर पूर्णवेळ ज्ञानार्जनाचे कार्य सुरू केले. आपल्या गाव-परिसरातील विद्यार्थ्यांना ते गणित, विज्ञानाचे धडे देऊ लागले अन्‌ तेही अगदी नि:शुल्क.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ज्ञानमंदिरातून स्पर्धा परीक्षांची तयारी

पंचप्राणेश्वर मंदिरात अण्णांची ही खासगी परंतु नि:शुल्क शिकवणी अनेक वर्षांपासून चालतेय. नवोदय, शिष्यवृत्ती, एमटीएस, सैनिकी स्कूल, अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी ते विद्यार्थ्यांकडून करू घेत आहेत.

एकही सुटी न घेता या मंदिरात नियमित वर्ग भरत असतात. मंदिराच्या इमारतीत तरुण वर्गासाठी एक वाचनालय अण्णांनी सुरू केले आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत अण्णांचा उत्साह एखाद्या तरुण शिक्षकाला लाजवेल, असा असतो. विद्यार्थीही तितक्याच तन्मयतेने शिकत असतात.

अन्य शहरांमधूनही विद्यार्थी

अण्णांच्या या ज्ञानमंदिरातून आजपर्यंत नवोदय विद्यालयासाठी २६० विद्यार्थ्यांची निवड झाली. आज अण्णांकडे जळगाव जिल्हा ग्रामीण व शहरी विभागातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सुरत, अशा विविध ठिकाणाहून ६० ते ७० विद्यार्थी शिकत आहेत, तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण भागातील होतकरू व तरुणांसाठी संगणक, लॅपटॉप अशा सुविधा देण्याचा अण्णांचा मानस आहे.

पांडुरंग पाटलांचा आज वाढदिवस. तोही सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजे, ८० वा अभीष्टचिंतन सोहळा. अशा या प्रतिभासंपन्न समाज शिक्षकाचा निःस्वार्थ भावनेने चाललेला हा ज्ञानयज्ञ सदोदित तेवत राहो, अशी मंगल कामना करूया.

"जे ज्ञान आपल्याकडे आहे, ते इतरांना आणि त्यातही गावखेड्यातील मुलांना दिले, तर त्याची फलप्राप्ती, समाधान वेगळे, म्हणून २० वर्षांपासून या मंदिरातच मुलांची शिकवणी घेतोय. आनंददायी काम आहे, ते असेच अविरत सुरू ठेवणार." -पांडुरंग पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT