Jalgaon: Vehicles of encroachment removal department in Phule market all day on Friday esakal
जळगाव

Jalgaon News : फुले मार्केट उघडले, अतिक्रमणाचा तिढा कायम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील महात्मा फुले मार्केटच्या व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ३) दुकाने उघडली. मात्र, अतिक्रमणाचा तिढा कायम आहे. सांयकाळी पाचपर्यंत महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाचा जागता पहारा होता.

मात्र, हे कर्मचारी निघून गेल्यानंतर दुकाने लावण्यासाठी अतिक्रमणधारकांची झुंबड उडाली आणि पुन्हा मार्केटमध्ये अतिक्रमणाची जत्रा भरली होती. (Phule Market opened encroachment problem continues Watch vigilance of encroachment squad After five in evening Sambad Jalgaon News)

महात्मा फुले मार्केटमध्ये अतिक्रमणधारक व दुकानदार यांच्यात गुरुवारी (ता. २) वाद झाले. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून अतिक्रमण कायमचे हटविण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिले. अतिक्रमणधारकांचा बंदोबस्त न केल्यास बेमुदत बंद ठेवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दुकाने उघडली, पण...

फुले मार्केटमधील दुकानदारांनी शुक्रवारी दुकाने उघडली. नियमित व्यवहार सुरू होते. अतिक्रमणधारकांची दुकाने लागली नाहीत. त्यामुळे बाजारातील मुख्य रस्ताही मोकळा होता. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी व पोलिसही पाहारा देत होते. मात्र, सायंकाळी अतिक्रमण होणार, याची भिती दुकानदारांना होती.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

सायंकाळी पाचनंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी फुले मार्केटमधून निघून गेले. त्यांनी त्या ठिकणाहून ट्रॅक्टर व वाहने काढून घेतली. त्यानंतर मात्र मार्केटमध्ये दुकाने लावण्यासाठी अतिक्रमणधारकांची एकच झुंबड उडाली. अगदी गाड्या आणि लोखंडी पेट्यांचे आवाज येऊ लागले आणि सायंकाळपर्यंत मोकळे असलेल्या रस्त्यांवर दुकांनाची जत्रा भरली.

रात्री आठपर्यंत कर्मचारी ठेवा

फुले मार्केटमधील दुकानदारांनी अतिक्रमण कायमचे हटवावे, अशी मागणी केली आहे. याबाबत दुकानदारांनी सांगितले, की इतर ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी रात्री आठपर्यंत असतात. मग फुले मार्केटमध्येच पाचपर्यंत का असतात. त्यांचीही नियुक्ती रात्री आठपर्यंत करावी. त्यामुळे अतिक्रमणधारक पुन्हा या ठिकाणी दुकाने लावणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT