Phule market jalgaon esakal
जळगाव

जळगाव : फुले मार्केटचे अतिक्रमण हटविण्यासाठी पत्राचा अजब खेळ

फुले मार्केटमध्ये कारवाई कधी होणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : फुले मार्केटमधील अतिक्रमण हटविण्याची गम्मतच भारी आहे, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेने पोलीसांना बंदोबस्त मागितला, तर दुसरीकडे पोलिसांनीच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, असे पत्र महापालिकेस दिले आहे. त्यामुळे सद्या तरी या पत्रांचा अजब खेळ सुरू आहे, दुसरीकडे फुले मार्केटमध्ये कारवाई कधी होणार, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या फुलेमार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील अतिक्रमण तत्कालीन उपायुक्त श्री. वाहुळे यांनी हटविले होते. त्या पुढे असलेले फळ बाजाराचे अतिक्रमणही काढले होते. मात्र आता हे अतिक्रमण पुन्हा झाले आहे. फुले मार्केटची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे, या ठिकाणी दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून ग्राहकांना ये-जा करण्यासाठीही जागा शिल्लक नाही. या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याची मागणी त्या ठिकाणच्या दुकानदारांसह अनेक नागरिकांनी केली आहे. पण त्यावर कारवाई झाली नाही.

पत्रांचा असाही खेळ

फुले मार्केटचे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने पोलिस बंदोबस्त मागितला आहे. यासाठी शहर पोलिस स्टेशनला दोन वेळा पत्रही देण्यात आले आहे. मात्र बंदोबस्त देण्याबाबत पोलिसांनी महापालिकेला काही कळविले नाही. या उलट पोलिसांनीच महापालिकेला एक पत्र पाठविले असून फुले मार्केटमधील अतिक्रमणाबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे फुले मार्केटमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात यावी, असे पत्र पाठविले आहे. पोलिस विभागाचे हे पत्र पाहताच महापालिकेचे अधिकारीही चक्रावले त्यांनी पुन्हा पोलिस विभागाला पत्र पाठवून अतिक्रमण हटविण्यासाठी बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी केली असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे सांगण्यात आले.

पोलिस बंदोबस्त देणार

अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे माहिती देताना सांगण्यात आले आहे, की पोलिसांनी बंदोबस्त देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता फुले मार्केटमधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याच्या मंजुरीबाबत उपायुक्तांकडे टिपणी ठेवण्यात आली आहे. त्यांनी मंजुरी दिल्यास कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT