bike Thief esakal
जळगाव

Jalgaon Crime News: अबब! चोरट्याने काढून दिल्या 14 दुचाकी; गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुस्क्या

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सातपुडा पर्वताला लागून असलेल्या चोपडा व अमळनेर तालुक्यांतून चोरीला गेलेल्या दुचाकीसह अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. अटकेतील संशयिताकडून तब्बल चोरीच्या १४ दुचाकी जप्त केल्या आहेत. अजय अंबालाल पावरा (वय २७, रा. वकवड, ता. शिरपूर) असे चोरट्याचे नाव आहे.

चोपडा आणि अमळनेर तालुक्यांत अनेक ठिकाण दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागूल, कमलाकर बागूल, संदीप पाटील, संदीप साळवे, पोलिस नाईक प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अशोक पाटील यांनी रविवारी (ता. १९) अमळनेर शहरातून संशयित अजय अंबालाल पावरा याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता, त्याने एकूण चोरीच्या १४ दुचाकी काढून दिल्या. त्याला दुचाकीसह अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT