Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : आयुक्तपदाच्या सुनावणीला ‘तारीख पे तारीख’

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती कायम आहे. त्यांच्या जळगाव आयुक्तपदाच्या नियुक्तीबाबत ‘मॅट’ची २० डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे देवीदास पवार यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार कायम असून, धोरणात्मक निर्णय मात्र सद्यःस्थितीत त्यांना घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले.

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी आपल्या झालेल्या बदलीविरुद्ध ‘मॅट’मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. मात्र, याच कालावधीत त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले आयुक्त देवीदास पवार यांनी पदभार स्वीकरला होता. त्यामुळे गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. (Postponed Date for Commissioner Hearing Next hearing on December 20 Pawar take charge Jalgaon News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मात्र, त्यांना पदभार मिळाला नाही. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी (ता. ९) होती. त्यानुसार पुन्हा ‘मॅट’समोर सुनावणी झाली. डॉ. विद्या गायकवाड याच्या वकिलांनी बाजू मांडली, तसेच शासनातर्फेही बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर बदलीच्या स्थगितीच्या निर्णयावर पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे.

आयुक्तपदी पवार पण...

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदली आदेशाच्या स्थगितीवर अंतिम सुनावणी होईपर्यंत जळगावच्या आयुक्तपदी देवीदास पवार राहणार आहेत. ‘मॅट’नेही पदभार त्यांच्याकडेच ठेवला आहे. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महत्त्वपूर्ण फायलींवर स्वाक्षरी करण्याबाबत आता प्रश्‍नचिन्हच आहे. आयुक्तांच्या पूर्ण अधिकाराबाबत आता ‘मॅट’मध्ये २० डिसेंबरला होणाऱ्या निर्णयावरच अवंलबून राहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT