Public awareness message printed in marriage certificate by Teli Parivar jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : अल्लाह गॉड वाहेगुरु एकच !लग्नपत्रिकेतून आदर्श संदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : लग्न सोहळा म्हटला म्हणजे पत्रिका आल्याच. किंबहुना लग्न सोहळ्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे लग्नपत्रिका मानला जातो. लग्नपत्रिकेत कुटुंबीयांसह भाऊबंदकीची नावे छापणे हा गेल्या अनेक वर्षांपूर्वीचा प्रघात डिजिटल युगातही कायम आहे. (Public awareness message printed in marriage certificate by Teli Parivar jalgaon news)

लग्नपत्रिकेतील नावावरून रुसवे, फुगवे, भांडणे, मतभेद झाल्याचीही अनेक उदाहरणे पाहायला मिळतात, असे असताना लग्नपत्रिकेतून विविध विषयांसंदर्भात जनजागृती करणारा आदर्श संदेश देण्याचा आगळावेगळा उपक्रम खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील तेली परिवाराने राबविला असून, त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

खडकदेवळा येथील तुकाराम तेली पोलिसपाटीलकी सांभाळून सामाजिक जाणीव व संवेदना जोपासत विविध उपक्रमांत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांनी हा उपक्रम राबविला असून, धोंडू तेली यांचे पुत्र डॉ. योगेश तेली व वाकी (ता. जामनेर) येथील आप्पा सरताळे यांची कन्या डॉ. महिमा यांचा विवाह येत्या ७ मेस जामनेर येथे होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यानिमित्त छापलेल्या लग्नपत्रिकेत तेली कुटुंबीयांनी आपले नातलग, हितचिंतक, भाऊबंद, आप्तेष्टांची नावे छापण्यासोबतच जनजागृतीपर संदेश छापला आहे. त्यात ‘अवयवदान व रक्तदान करा’, मुलगी वाचवा- मुलगी शिकवा’, ‘पाणी जपून वापरा’, ‘वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करा’, ‘जाती धर्म अनेक : देव मात्र एक’, असा संदेश छापून आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचे कौतुक होत असून, लग्नासोबतच लग्नपत्रिकेतील संदेशाची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT